काळासोबत माणुसकी संपत आहे; भररस्त्यात ” त्याने ” कुत्र्याला लावला गळफास..
दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो की समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात त्या समाज माध्यमांमुळे लोकांपर्यंत अगदी सहज पोहोचतात आपण बऱ्याचदा व्हिडिओ पाहतो जे आपल्याला हसवतात मनोरंजन करतात तर काहींमध्ये तर खऱ्याखोऱ्या सत्य घटना देखील दाखवल्या जातात आणि काही तर अशा असतात की ज्या पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकते अपघात असेल मारहाण असेल अथवा कुठे होणारा अन्याय असेल अशा दुर्घटनांचा व्हिडिओ आपण बऱ्याच वेळेस पाहतो यामध्ये अशा घटना कधी माणसांबरोबर होतात तर कधी प्राण्यांबरोबर देखील होतात अशी व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप संताप करताना देखील आपण पाहिले आहे असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील इतरांसारखेच संता व्यक्त कराल
कुत्रा हा अनेकांचा लाडका व आवडता प्राणी आहे सगळ्यात प्रामाणिक म्हणून कुत्रा या प्राण्याकडे पहिले जाते. खूप जण हाऊस म्हणून त्याला आपल्या घरी पाळतात अगदी कुटुंबाचा भाग असल्यासारखं त्याला जीव लावतात त्याचे सर्व लाड पुरवणे घरातील सदस्य असल्याप्रमाणे वागणूक देणे अशा गोष्टी आपल्या कित्येकदा निदर्शनात आले असतील पण समाजामध्ये प्राण्यांचा द्वेष करणारेही लोक आहेत जे प्राण्यांना विनाकारण त्रास देत असतात त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात अमानुषपणे मारहाण करून पापाचे धनी होत असतात आज पर्यंत तुम्ही सोशल मीडियावर श्वानांना अमानुषपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण हा व्हिडिओ मात्र वेगळा आहे या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती चक्क त्या कुत्र्याचा जीव घेताना दिसत आहे
व्हिडिओ पाहताना तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा राहून त्या झाडावर दोरी टाकून त्या कुत्र्याला गळफास देताना दिसत आहे या कुत्र्याच्या गळ्यामध्ये एक दोरी बांधली आहे तर दुसऱ्या बाजूने ती दोरी झाडावर टाकून ओढताना हा वृद्ध व्यक्ती आपल्याला दिसत आहे कुत्र्याही जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे सदरची घटना ही भररस्त्यात होत असून यावेळी एकही व्यक्ती त्या कुत्र्याची मदत करण्यासाठी आला नाही सोशल मीडियावर नेटकरी मात्र संताप व्यक्त करत आहेत
सोशल मीडियावर बरेचसे प्रश्न या व्हिडिओमुळे उपस्थित झाले आहे त्यात सगळ्यात महत्त्वाची कमेंट म्हणजे ज्याने हा व्हिडिओ काढला त्याने व्हिडिओ काढण्याऐवजी जर जाऊन त्या कुत्र्याची मदत केली असती तर आज तो कुत्रा वाचला असता पण कुठेतरी सोशल मीडियामुळे आपल्या भावना मरायला लागल्या आहेत हे मात्र नक्की..