संशय आल्याने पोलिसांनी डॉक्टरची गाडी थांबवली; गाडीत मिळाले असे काही की विश्वास बसणार नाही. पाहा बातमी
गुन्हेगारीचे प्रमाण आजकाल वाढताना दिसत आहेत. यामध्ये गुन्हेगार हा कोणीही असू शकतो. सदरील घटना अकोला जिल्ह्यातील आहे. अकोला मधील पोलिसांना माहिती मिळाली. एका चार चाकी वाहनांमधून एका महिलेचा मृतदेह घेऊन त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहनाला थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता, त्या वाहनांमध्ये महिलेचा मृतदेह एक डॉक्टर पती घेऊन जात असताना आढळून आलं. याबाबत त्या डॉक्टरला पोलिसांनी विचारले असता त्या डॉक्टरकडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल त्यावेळेस आपली पत्नीची प्रकृती चिंताजनक असून हृदयविकारामुळे मृत्यू झालाय, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशी अनेक उत्तरे त्याने पोलिसांना दिली. आणि त्याच्या बोलण्यातूनच पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्या डॉक्टरच्या वाहनातून महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
यामध्ये वैद्यकीय अहवालात खळबळ जनक माहिती समोर आली. त्या मृत महिलेची गळा आवळून हत्या झाल्याचा समोर आलं. वर्षा ठाकरे असं या मृत महिलेचं नाव आहे, तर डॉक्टर राजेश ठाकरे असं तिच्या पतीचे नाव आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर नेमकं हत्येचा कारण काय हे स्पष्ट होईल.
पत्नीचा मृतदेह घेऊन जाताना डॉक्टर पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा पती त्याच्या गाडीतून या महिलेला घेऊन जात होता. शवविच्छेदन केल्यानंतर जो अहवाल आला त्यामध्ये या महिलेचा मृत्यू गाळा आवळून झाल्याचे स्पष्ट झालं. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून त्याचा पुढील तपास करत आहेत.