एकमेकांच्या बायकोसोबत हॉटेल रुममध्ये आले, समोरासमोर भेट होताच जे घडंलं ते Shocking
नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. नेमके काय घडले ?
सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ शेअर केले जात आहेत. काही मजेदार तर काही धडकी भरवणारे असतात, तर काही व्हिडीओ हे पाहून नक्की चाललंय काय हेच कळत नाही. नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. नेमके काय घडले?
व्हिडिओमध्ये दोन जोडपे हॉटेलमध्ये जाताना दिसत आहेत. दोन्ही जोडप्यांची रुम ही समोरासमोर असते. थोड्यावेळात त्यांच्यात भांडणं सुरु होतात आणि यामागचं कारण आहे त्यांचा जोडीदार. खरंतर ते एकमेकांच्या बायकोसोबत ओयो रुममध्ये आले होते.
व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, आधी एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलच्या खोलीत शिरला. खोलीत जाण्यापूर्वी दोघांनी खोलीबाहेर चप्पल काढली. आता आणखी एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडसह समोरील खोलीत प्रवेश करत आहे. तेवढ्यात दुसऱ्या व्यक्तीची नजर बाजूच्या खोलीसमोर असलेल्या चपलीवर जाते.
ही चप्पल आपल्याच बायकोची आहे हे त्याने ओळखले. त्यानंतर त्याने या खोलीचा दरवाजा ठोठावला. पहिल्या व्यक्तीने दार उघडले. तेव्हा या दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या महिला पाहून दुसऱ्या पुरुषाच्या पायाखालची जमीनच सरकली. ही महिला दुसरी कोणी नसून त्याची बायको आहे.
पुढे जे झालं ते अधिक वादग्रस्त आहे. आरडाओरडा ऐकून दुसऱ्या व्यक्तीची गर्लफ्रेंड देखील खोलीबाहेर आली. त्यानंतर लक्षात आलं की ती पहिल्या व्यक्तीची बायको आहे. याचाच अर्थ असा की ते दोघेही एकमेकांच्या बायकोसोबत आले होते.
नकळत दोघांनी एकाच दिवशी एकाच हॉटेलमध्ये रूम बुक केल्या होत्या. याघटनेनंतर व्हिडीओ इथेच संपतो. पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ स्क्रीप्टेड असल्याचं म्हटलं जात आहे.