जगदीश केदार यांची कर सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
पाथर्डी तालुक्यातील हत्राळ सैदापुर येथील जगदिश केदार यांची लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कर सहाय्यक पदि निवड झाल्याबद्दल हत्राळ सैदापुर ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी बबनराव केदार होते, तसेच गावचे सरपंच भिमराव टकले, उपसरपंच सुखदेव केदार, राजेंद्र केदार सर, पाडळी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब कचरे, शेषराव कचरे, भानुदास गर्जे, अशोकराव गर्जे, डॉ,क्रुषिराज टकले संभाजी बडे एकनाथ केदार, रामभाऊ केदार, नामदेव काकडे, टकले गुरुजी,पाखरे गुरुजी ,म्हतारदेव गर्जे गुरुजी,राऊसाहेब कावळे वसंत केदार, नवनाथ केदार, पोपटराव केदार, तसेच हत्राळ सैदापुर व पाडळी गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
हत्राळ हे खुप कमी लोकसंख्या असलेल गाव, परंतु एका महिन्यात चार अधिकारी या गावात झाले,या गावचा आदर्श घेण्यासारखे आहे, येथील नविन मुलं खूप मेहनत अभ्यास चिकाटीने व एकमेकांना प्रेरणा देतात,या गावाची वोळख महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, जगदीश केदार हा शेतकरी कुटुंबातील असुन खुप हलाखीच्या परिस्थितीत मात करून हे यश संपादन केल्या मुळे सर्व स्तरातून जगदीश केदार अभिनंदन होत आहे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा शिवणकर यांनी केले तर परमेश्वर टकले यांनी आभार मानले.