नगर खबर : मेंढ्यांची आंघोळ जीवावरती बेतली, दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे ठीक ठिकाणी पाणी साचलेलं असतं अशा पाण्याच्या ठिकाणी आपल्या घरातील काही मंडळी किंवा लहान मुलं जात असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी अनुचित असे प्रकार घडतात अशीच एक बातमी समोर येत आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावातील हि घटना आहे.
या ठिकाणी सख्या दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. येथे मेंढ्यांना धुण्यासाठी हे दोन्ही भाऊ तलावावरती गेले होते. संदीप आणि बापू अकोलकर कर असे या दोघांची नावं आहेत. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे संदीप अकोलकर वय वर्ष 29 आणि बापू अकोलकर वय वर्ष 27 या तरुण दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबतीत आणखी मिळालेली माहिती अशी कि मयात भावांचे शेत हाडे वस्ती या भागात होतं आणि बोरुडे तलावालागत या मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. मेंढ्या काही वेळ चरून झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी डबक्यात गेल्या आणि त्यानंतर हा प्रकार घडला मेंढीचे पाणी पिऊन झाल्यानंतर संदीप पाण्यात उतरले आणि मेंढीला पाणी देऊ लागले संदीपचा पाय घसरला आणि त्याचा लहान भाऊ याला त्याचा आवाज आला आपला भाऊ घसरल आहे त्याला वाचवण्यासाठी म्हणून त्याचा दुसरा भाऊ तिथे जातो आणि त्या भावाची वर येण्यासाठी मदत करत असतो संदीपला हात दिला मात्र संदीपला वर काढण्यामध्ये त्याला अपयश आलं.
दुसर्या भावाला वाचवण्यासाठी गेलेला भाऊ पण पाण्यात घसरून पडला. एवढ्यात बापूच पाण्यात गेला आणि दोघेही पाण्यात पडले यामध्ये दोघांनाही पाण्यात पोहता येत नव्हतं. पोहता येत नसल्याने दोघहि आपापले प्राण वाचवू शकले नाही. आणि त्यामुळे हे दोघे पाण्यात बुडाले. हे सगळ लांबून संदीपची पत्नी सोनाली हिने पाहिले आणि तिने त्या दोघांना वाचविण्यासाठी आरडाओरडा केला त्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी धावपळ केली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला या दोन्ही तरुणांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाथर्डी या ठिकाणी पाठवण्यात आले दत्तू बापू अकोलकर कर हे अत्यंत गरीब आणि शांत कुटुंबातून होते मजुरी आणि मेंढपाळ यावर त्यांचा उदरनिर्वाह होता. संदीप यास एक तीन महिन्याचा मुलगा आहे. तर बापू अकोलकर हा अविवाहित होता एकाच कुटुंबातील सख्या दोन भावांचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर करंजी गावात शोककळा पसरलीय या दोघांच्या अचानक असं होण्यामुळे नातलग आणि घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला.