नगर ब्रेकिंग : वाहिनीला बंदूक दाखवत होता आणि …. ?
गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत असतात एक बातमी अशी समोर येते आहे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव या ठिकाणची आहे. भावजईला गावठी कट्टा दाखवण्याच्या नादात आरोपी विशाल भालेराव यांच्याकडून गोळीबार झाला. आणि थेट भावजय सुनीता हिच्या डोक्यात गोळी शिरली. आणि ती गंभीर जखमी झाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सुनीता यांना उपचारासाठी लोणी येथे दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केला.
दिराने केलेल्या गोळीबारात अखेर उपचारादर भावजई मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. ही घटना नगर जिल्ह्यातील आहे आणि हा आरोपी हा कोपरगावचा आहे या आरोपीला पोलिसांनी अटक देखील केले आहे.
आरोपी विशाल भालेराव आणि त्याचे दोन साथीदार घटनेनंतर पसार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीसानी आरोप्यांचा शोध घेण्यासाठी पथक देखील रवाना केला आहे.शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप शेख बाळकृष्ण वर्पे दळवी या आरोपींचा शोध घेण्यासाठी माहिती संकलित करत आहेत. अखेर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी विशाल भालेराव याला पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हेगारींच्या घटना घडत असतात या दिवसेंदिवस वाढ होत असते अनेक जण आपल्याकडे अशा सर्व आहे त्या शस्त्रांचा साठा करत असतात आणि त्यातून अनुचित प्रकार घडत असतात असाच एक धक्कादायक प्रकार कोपरगाव या ठिकाणी घडलाय कोपरगाव मध्ये आपला दिर आपल्या वहिनीला बंदुकीच्या गोळ्या दाखवत होता आपला दीर आपल्या वहिनीला बंदूक दाखवत होता आणि त्या क्षणी गोळीबार झाला ही गोळी थेट वहिनीच्या डोक्यात शिरले त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांच्यावरती उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
मात्र वहिनीला बंदूक दाखवत असताना गोळीबार झाला की, हा कट आहे ? याकडे पोलीस आता तपासणी करत आहेत. या घटनेनंतर आरोपी व साथीदार फरार आहे आणि त्यासोबत दोन साथीदार देखील फरार आहेत ही बंदूक दिराकडे कडे कशी आली आणि त्यानंतर या वहिनीचे यामध्ये कसम मृत्यू झाला याचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत