निसर्गोपचार संस्थेला पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परवानगी द्या मंत्री प्रताप जाधव यांच्याकडे मागणी.
नगर : प्रतिनिधी
पुणे येथील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवाणगी देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे गुरूवारी केली.
मंत्री जाधव यांना देण्यात आलेल्या निवेदनात खासदार लंके यांनी नमुद केले आहे की, सन २०२१-२१ मध्ये कोरोना महामारीसाख्या भयंकर आजरावर मात करण्यासाठी आपण आपल्या मतदारसंघात १ हजार १०० बेडचे कोव्हीड सेंटर चालविले. या कोव्हीड सेंटरमध्ये नियमित उपचार पध्दतीबरोबरच आयुर्वेद, निसर्गोपचार व योगा अशा पध्दतींचा अवलंब करून उपचार करण्यात आले. त्यातून अनेक रूग्णांनी कोरोनावर मात केली.
काही महिन्यांपूव आयुष मंत्रालयाच्या आखत्यारीत येणाऱ्या पुणे येथील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेस भेट दिली असता संपूर्ण संकुलाची रचना तसेच उत्तम प्रकारचे नियोजन तिथे आहे. या निसर्गोपचार संस्थेस दिलेल्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेतून पुढे आलेल्या गोष्टींनुसार या संस्थेस पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या बीएनवायएस या पदवीच्या शिक्षणाचा कालावधी साडेपाच वर्षांचा करण्यात यावा, जेणेकरून या अभ्याक्रमाला इतर राज्यातही मान्यता मिळू शकेल याकडे खा. लंके यांनी मंत्री जाधव यांचे लक्ष वेधले आहे.
खा. लंके यांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री जाधव यांनी यावेळी दिली.