बार्टी समतादूत प्रकल्प अहिल्यानगर तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे समतादूत प्रकल्प अहिल्यानगर च्या वतीने संविधान 75 वे अमृतमहोत्सवी वर्षे च्या निमित्ताने घर घर संविधान च्या अनुषंगाने विविध उपक्रमाव्दारे संविधानाची जागरूकता, संविधानाचे महत्त्व त्यातील कर्तव्य, मूलभूत हक्क ,मुल्ये आणि त्यातील विविध तरतूदीबाबत विद्यार्थीमध्ये तसेच नागरिकामध्ये जागरूकता वाढविण्यासाठी रॅली, प्रबोधन कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, पथनाट्य, संविधान उद्देशिका चे वाचन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी समतादूत मार्फत कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले
संविधान सप्ताह साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रम अंतर्गत देविभोयरे पारनेर अंबिका विद्यालय, लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय राहुरी, धर्मनाथ विद्यालय जवळे , संत तुकाराम विद्यालय बारागाव नांदुर, पी जी अंबरे विद्यालय संगमनेर, मढी विद्यालय ,जि.प.शाळा निंबेनांदुर , मळगंगा विद्यालय निघोज, चांदेकसारे ग्रामपंचायत अकोले ,भातकुडगाव हायस्कूल शेवगाव आदि ठिकाणी कार्यक्रम समतादूत मार्फत विविध उपक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, पालक, सरपंच उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहे तसेच संपूर्ण सप्ताह अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून हर घर संविधान ही संकल्पना चे आयोजन सहा.आयुक्त समाजकल्याण अहिल्यानगर चे प्रविण कोरगटीवार साहेब , बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील समतादूत रजत अवसक, संतोष शिंदे, वसंत बढे, रवी कटके, सुलतान सय्यद व पिरजादे एजाज हे विद्यालय व महाविद्यालय येथे तालुकास्तरावर कार्यक्रम चे आयोजन केले आहे.