भूकंपाच्या झटक्याने नाशिक हादरल ! पाहा काय आहे बातमी सविस्तर
‘आपल्या पायाखालची जमीन सरकली… असं तुम्ही बऱ्याच वेळा म्हणत असाल, मात्र ही जमीन जर खरंच सरकली तर ? होय.दिंडोरी तालुक्यातील जमीन खरंच सरकली, या आज दिंडोरी मध्ये तालुक्यासह शहरात आणि काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. बसलेला माणूस हा भयभीत झाला तर उभा असलेला माणूस हा जमिनीवरती कोसळला. घरातील भांडे देखील जमिनीवरती पडले. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं. संशोधन केंद्रात अद्यापही कुठलीही नोंदणी झाली नाहीये मात्र वरिष्ठ पातळीवर याची माहिती घेतली जात आहे.
नेमकं काय घडलं पाहुयात सविस्तर !
दिंडोरी तालुक्यासह शहरात आणि दिंडोरी परिसरात ८: 58 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्का बसला. हा भूकंपाचा धक्का सुमारे ३:5 रिस्टर स्केलचा होता. हा धक्का इतका जबरदस्त होता की अक्षरशः जमिनीवर बसलेला माणूस घाबरून गेला, काही नागरिक तर उभ्याने खाली पडले. घरातील भांडे जमिनीवरती पडले. त्यामुळे दिंडोरी शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं. तीन मिनिटाच्या अंतराने दुसरा धक्का बसला म्हणजेच सुमारे साडेनऊच्या दरम्यान दुसरा धक्का देखील जाणवला , जवळपास दिंडोरी तालुक्यातील 80 टक्के गावांना हा धक्का बसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दोन वेळा धक्का जाणवला त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकानी घाबरून न जाता काळजी घ्यावी. अफवांवरती विश्वास ठेवू नये अशी माहिती आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रवीण कुमार जोहरे यांनी व्यक्त केली माहिती दिली आहे. दिंडोरी तालुक्यात विविध गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला. मेरी येथील संशोधन केंद्रात याबाबत कोणतेही नोंद नसल्याचं तहसीलदारनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये असा अहवाल देखील यावे तहसीलदारांनी केल.