महापरिनिर्वाण दिनी खा. निलेश लंके यांच्याकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

अहिल्यानगर :भारताच्या संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड चौकात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांनी डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळीराष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. आंबेडकरांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थितांनी मोठ्या श्रद्धेने अभिवादन केले.या

वेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले,आंबेडकरांचा विचार म्हणजे राष्ट्रबांधणीचे सामर्थ्य. समता, बंधुत्व आणि न्यायाची दिशा देणारे मार्गदर्शक तत्त्व म्हणजे आंबेडकरी चळवळ. समाजाला सक्षम आणि जागरूक बनवणारा हा विचार आजही तितकाच प्रभावी आहे.महामानवांच्या विचारांना नवसंजीवनी देणारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचवणारा हा कार्यक्रम विशेष ठरला. यावेळी कार्यक्रमात माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी उपसभापती बापूसाहेब शिर्के, विक्रम राठोड, गिरीश जाधव, योगीराज गाडे, अल्ताफ शेख, चंद्रकांत उजागरे, दिलदार सिंग बीर, प्रदीपकुमार खिलारी, महेश बोरुडे, समाजसेवक देडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.



