व्हाईट कॉलर

महिने ६, रूग्ण २६, मदत ६१ लाख ! पंतप्रधान फंडातून खा. निलेश लंके यांच्या माध्यमातून मोठी मदत.

पारनेर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राज्यातील २८८ आमदारांमध्ये सर्वाधिक मदत मिळवून देण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या खासदार नीलेश लंके यांनी संसदेत जाऊन सहा महिन्यातच राज्याप्रमाणेच दमदार कामगिरी केली आहे. ६ महिन्यात २६ रूग्णांना त्यांनी ६१ लाख २२ हजार ५०० रूपयांची मदत विविध रूग्णांना खा. नीलेश लंके यांच्या शिफारशीवरून प्रंतप्रधान सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे.

विविध आजारांमुळे त्रस्त असलेल्या रूग्णांना मदत करण्याचा पिंड खा. नीलेश लंके यांचा आहे. त्यांचे नीलेश लंके प्रतिष्ठान किंवा विविध धर्मदाय रूग्णालयांमधून ते गरजू रूग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात गेल्या अनेक वर्षांपासून उपचार मिळवून देत आहेत. विधानसभेत गेल्यानंतर त्यांनी विशेषतः मुख्यमंत्री सहायता निधीचा मोठया खुबिने वापर करून घेत राज्यात सर्वाधिक रूग्णांना या फंडातून मदत मिळवून दिली. या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनीच त्याची माहीती अधिकृतपणे यापूवच जाहिर केलेली आहे.

उपचारासाठी मतदारसंघातीलच नव्हे तर राज्याच्या कोणत्याही भागातील रूग्ण किंवा त्याचा नातेवाईक आल्यास त्यांना मदत करण्याची खा. लंके यांची भुमिका असते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यालयात वैद्यकिय कक्षाची स्थापना केली असून सबंधित रूग्णाचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याचे काम हा कक्ष करतो. राज्यपातळीवरील काही तज्ञही या कक्षाला मदत करतात.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!