‘यांना आधी बाहेर काढा …या महिला खासदाराला मिळाली पोलीस स्टेशनमध्ये अशी वागणूक !
"Get them out first ... This woman MP got this kind of behavior in the police station!
बातमी अमरावतीहून समोर येते, अमरावतीच्या पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत खळबळ जनक असा प्रकार घडला आहे. राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये नवनीत राणा या गेल्या होत्या, या ठिकाणी लव जिहादच्या एका प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी खासदार नवनीत राणा नेहमीप्रमाणे आक्रमक शैलीमध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या.
वाद घालण्याला त्यांनी सुरुवात केली , मात्र त्यांनी जास्त आरडाओरडा केल्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी चांगलेच आक्रमक झाले. राजापेठ पोलीस ठाण्यात यांना बाहेर काढा अशा सूचना केल्या, त्यामुळे वातावरण आणखी तापलं,
या प्रकरणात पोलिसांकडून तपासा चालढकलपणा होत आहे असा आरोप केला . पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये आणा व पोलीस याप्रकरणी तपासला, एवढा उशीर का करतात असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला? यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांना आपला फोन रेकॉर्ड केलाच आहे आरोप केला, मी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला हे विचारण्यासाठी पोलिसांना फोन केला होता. माझा फोन रेकॉर्ड करण्यात आला. राज्य सरकारनं तुम्हाला माझा फोन रेकॉर्ड करायचे आदेश दिलेत का हे मला सांगा असं म्हणत नवनीत राणा यांनी प्रचंड अखंड तांडव केला.
मात्र पोलीस ठाणेदार यांचा देखील संयम तुटला आणि त्यांनी राणा यांना उद्देशाने या सगळ्यांना येथून बाहेर काढा असं म्हटलं , त्यामुळे नवनीत राणा आणखीच आपल्या त्यांनी आक्रमकपणे हात वारी करत, पोलीस ठाणेदाराना जाब विचारला सुरुवात केली. त्यावेळी पोलीस ठाणेदार यांना देखील राणा यांना जशास तसे उत्तर दिले संबंधित पोलीस ठाणेदार यांनी आपल्या भूमी कडे ठाम राहिला. शेवटपर्यंत राणा यांना त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तर देत राहिला. नवनीत राणा आणि त्यांच्या समर्थकांना पोलीस स्टेशन मधून बाहेर काढण्यात आला. तबल दोन तास हा राडा सुरू होता, त्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी बातचीत केली. दोन तासात ही मुलगी समोर आणा असा अल्टिमेटम नवनीत राणा यांनी पोलिसांना दिले. मात्र नेहमी प्रकारे आक्रमक शैलीत त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे राणा यांना आज बाहेर काढा असं म्हणतात आलं यावरून वातावरण चांगलं तापलं आहे.