हवामान अंदाज- आजपासून ‘या’ तारखेपर्यंत पावसाची उघडीप, ‘या’ दिवशी पुन्हा पाऊस, वाचा सविस्तर
Weather forecast- Chance of rain from today to 'this' date, rain again on 'this' date, read in detail

शेतकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी, या पुढील काही दिवस पाऊस हा विश्रांती घेणार आहे. त्यामुळे आपली काही महत्त्वाची कामं असतील तर ती आवरून घ्या. कारण की पाऊस आता विश्रांती घेईल असा हवामान खाता अंदाज वर्तवला आहे. परभणी ते प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सुधारित हवामान अंदाज जारी केला . राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मान्सून यांना अक्षरश थैमान घातले , आता हाच मान्सून आता काही दिवस विश्रांती घेणार आहे असं ते म्हणतात.
या मान्सून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले काही ठिकाणी महापुराची परिस्थिती ओढवली होती, तर काही ठिकाणी ओढे आणि नंदलाला यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आला होता धरण ओव्हरफ्लो झाले अशी बातमी सगळीकडे येते त्यामुळे आता पुढील तीन दिवस शेतकऱ्यांची जी काम आहे ती शेतकऱ्यांनी करून घ्यायचे कारण पंजाबराव यांच्या हवामान खात्यानुसार राज्यात 17 18 आणि 19 ऑगस्ट या तीन दिवसात पावसाची उघडीप राहणार आहे आणि सर्वत्र सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी या तीन दिवसात आपली सर्व कामावरून घ्यायचे आहेत असा सल्ला पंजाबराव यांनी दिला. 19 तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार होऊन वीस तारखेला राज्यात पुन्हा एकदा पावस होईल , त्यानंतर 23 तारखेपर्यंत पाऊस सुरू राहिल नंतर एकदा विश्रांती केले एक दिवसाचा पुन्हा ब्रेक असणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे आता पावसाचे वेळापत्रक तुमच्या हाती आलेला आहे. परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव यांनी या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता पुढील तीन दिवस पावसाची उघडीप राहणार आहे.घरा बाहेरची महत्वाची काम आता आटपून घ्या .