व्हायरल व्हिडिओ: टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेच्या धडकेत रुग्णासह ३ जण जागीच ठार.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर कायमच या पावसामुळे ओलावा असतो. आणि रस्ता ओला असल्यामुळे आपण पाहतो की बऱ्याच वेळेस अपघात होत असतात. या गाड्यांचे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात अपघात होत असतात. सध्या एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे. या अपघातात बाईक कार किंवा ट्रक या कशाचाही समावेश नसून चक्क हा अपघात एका ॲम्बुलन्स झाला आहे. हि ॲम्बुलन्स एका रुग्णाला घेऊन जात होती आणि ही रुग्णाला घेऊन जात असताना या रुग्णवाहिकेचा अतिशय भयंकर असा अपघात झाला आहे. ही रुग्णवाहिका एका टोल नाक्यावर धडकली.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, कर्नाटक राज्यामध्ये या रुग्णवाहिकेचा अपघात झाला आहे. हा अपघात बिंदूर टोलनाका जवळ घडला आहे. आणि या अपघाताचे दृश्य आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. जेव्हा या अपघाताचा आपण व्हिडिओ पाहतो तेव्हा आपल्या अंगावर काटा येईल. आपल्याला धडकी भरेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, पाऊस येत आहे आणि एक रुग्णवाहिका सायरन वाजवत वेगाने येत असते, रुग्णवाहिकेमध्ये एक पेशंट आहे. आपण ट्राफिक मध्येही रुग्णवाहिकेला लगेच जागा देत असतो. तसेच या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, रुग्णवाहिका दिसताच टोल नाक्यावरील कर्मचारी रुग्णवाहिकेच्या मार्गात जे येणारे अडथळे आहेत ते दूर करताना आपल्याला दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये कर्मचारी बॅरिकेट्स हटवायला जातात, जशी ॲम्बुलन्स जवळ येते तसं त्या ॲम्बुलन्सच नियंत्रण सुटतं आणि ती रस्त्यावरून स्लिप होताना दिसते. ती रुग्णवाहिका थेट टोल नाक्यावरील टोल बूथ कॅबिनला येऊन धडकते. यामध्ये व्हिडिओमध्ये अपघात किती भयंकर आहे हे आपल्याला दिसत आहे. या अपघातामध्ये ॲम्बुलन्स संपूर्ण गोल फिरवून टोल नाक्याला धडकली आणि धडकल्यानंतर त्या ॲम्बुलन्सचा मागचा दरवाजा उघडला जातो. आणि त्यातील रुग्णासह कर्मचारी बाहेर फेकले जातात.
मिळालेल्या माहितीनुसार ही ॲम्बुलन्स एका रुग्णाला कोंडापूर ला घेऊन जात होती हा अपघात बेंदूर मधील शिरूरु गावातील हायवेवर झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेली माहिती समोर आली आहे यात रुग्णाचा ही समावेश आहे.