बाईचा नाद ! गेवराईत माजी उपसरपंचाची आत्महत्या; नर्तिकेशी प्रेमसंबंधातून घडला धक्कादायक प्रकार.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्गे हे गेवराई येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडच्या प्रेमात गुंतले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती आणि हळूहळू त्यांचे संबंध प्रेमसंबंधात बदलले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजा त्यांच्याशी बोलत नव्हती, यामुळे बर्गे मानसिक तणावाखाली होते.
सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, तिथे अपेक्षित घडामोडी न झाल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या घरासमोर कारमध्ये बसून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणात बर्गेंच्या नातलगांनी तक्रार दाखल केली असून, पूजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने बर्गेंना बंगला आणि शेतीजमीन आपल्या नावे करण्याची मागणी केली होती, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिस या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करत आहेत.