एका क्लिकवर खा. निलेश लंकेंची संपूर्ण गडकोट किल्ले मोहीम, पहा खा. लंके गड किल्ल्यावर जाऊन नेमकं काय करतात ? पहा सविस्तर..

अनेक मावळ्यांचा ताफा घेऊन आदल्या रात्रीच किल्ल्याच्या पायथ्याशी खा.लंके मुक्कामी जातात ,ज्या भागात ते जातात त्या भागातील त्यांचे चाहते त्यांचे भव्य दिव्य असं स्वागत करतात ,अकोले तालुक्यातही त्यांचा असंच स्वागत करण्यात आल,

मोहिमेतील सातव्या ह्या किल्ल्यावर धुक्याने दाटलेले ढग होते, पण वरुणराजाने विश्राम घेतल्याने प्रत्येक वेळी सारखी या किल्ल्यावर फजिती झाली नाही,

कृषिभूषण प्रभावती घोगरे ताई तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्या उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून अभिवादन केल.

जिजाऊ वंदना आणि शिवप्रतिज्ञाना कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर संस्कृती जपत कथक नृत्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि अभंग याचे सादरीकरण चिमुकल्या मुलींनी केल आणि खरी सुरुवात झाली ती आता गडकोट संवर्धनाने स्वच्छता मोहिमेला…


वाटेत लागणाऱ्या पुरातन मंदिरात खा.निलेश लंकेने हातात झाडू घेऊन साफसफाई केले.

पर्यटकांना क्षणभर विश्रांतीसाठी या ठिकाणी लोखंडी बेंचेस ठेवण्यात आल्या विशेष म्हणजे कित्येक उंच किल्ल्यावर कधी मावळे कधी खा.लंके देखील डोक्यावरती या बेंचेस घेऊन जातात,


किल्ल्यावरती कचरा न होऊ नये यासाठी कचऱ्या साठवणुकीचे मोठे कंटेनर ठेवले जातात ,

शिवप्रेमींना इतिहास कळावा त्यासाठी आपला मावळा आपल्या पाऊलखुणा त्या ठिकाणी सूचनाफलकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठेवून येतात….


पहाटे जेव्हा मावळे ट्रेकिंग करतात तेव्हा त्यांना उजेड मिळावा यासाठी आपला मावळा यांनी येथे सौर पॅनलचे दिवे बसवले.

शेवाळ असेल तर शेवाळ ब्रशनी काढतात, वेडवाकड वाटेतील गवत आपले मावळे हाताने काढतात.

मोहिमेत छोटा मावळा तर येतोच पण आमचा टोपीवाला खराखुरा वयोवृद मावळा देखील किल्ला सर करून वर येतो.


सरते शेवटी इतकचं ज्या राज्यांनी स्वराज्य उभ केलं तो ठेवा जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे, महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर ह्या गड कोट किल्ल्याचं रूपडं बदलून जाईल.

जे नगर दक्षिणचे खा.निलेश लंकेना सुचलं ते प्रत्येकाला सुचाव हीच जगदंबे चरणी प्रार्थना 🚩


