” अशी कोणती गोष्ट आहे जे महिला कधीच विसरत नाही? ” शेजारील व्यक्तीचं उत्तर ऐकून पोट धरून हसाल..

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. विशेषत: रस्त्यावर किंवा बागेत यूट्यूबर्स लोकांना मजेशीर प्रश्न विचारतात आणि त्यावर मिळणारी हटके उत्तरं नेटकऱ्यांना खळखळून हसायला भाग पाडतात. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे.
एका यूट्यूबरने एका जोडप्याला थोड्या गप्पांदरम्यान विचारलं, “स्त्रिया अनेक गोष्टी विसरतात; पण अशी कोणती गोष्ट आहे, जी त्या कधीही विसरत नाहीत?” हा प्रश्न ऐकताच तिथे उपस्थित महिला हसू आवरू शकल्या नाहीत. पुरुषाने काही क्षण विचार करून दिलेलं उत्तर ऐकताच मात्र सगळ्यांचा हशा पिकला. त्याने सांगितलं, “स्त्रिया शेजाऱ्यांनी दिलेली भांडी कधीच विसरत नाहीत.”
या उत्तरावर लगेचच आजूबाजूला खळखळून हशा पसरला. शेजारी बसलेली महिला इतकी हसू लागली की थांबायलाच तयार नव्हती. यूट्यूबरसुद्धा काही क्षण थबकला आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.
हा व्हिडिओ @blacklisted_x3 या हँडलवर शेअर करण्यात आला असून त्याला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “खरंच भन्नाट सत्य सांगितलं आहे,” तर दुसरा लिहितो, “स्त्रिया भांडीपेक्षा पुरुषांच्या चुका पटकन विसरतात.” काहींनी या उत्तराला “मनमोकळं हसवणारं” असंही म्हटलं आहे.