“महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता : निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आगळावेगळा उपक्रम”

अहिल्यानगर :
विजयादशमी (दसरा) व महात्मा गांधी जयंती या पावन दिनाचे औचित्य साधून “स्वच्छ भारत – एकतेचा संकल्प” या उपक्रमाअंतर्गत लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली व आपला मावळा संघटनेच्या वतीने शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे.
दि. २ ऑक्टोबर २०२५, गुरुवार रोजी सकाळी ७.३० वाजता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून (वाडिया पार्क, अहिल्यानगर) या उपक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, आनंद ऋषीजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता होईल.
📍 समारोप माळीवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता होणार असून, खासदार निलेश लंके यांच्या हस्ते शहरातील सफाई कर्मचारी बांधवांचा सत्कार करण्यात येईल.
🌟 उपक्रमाचे वैशिष्ट्य
🔹 अनेकदा महापुरुषांचे पुतळे फक्त जयंती–पुण्यतिथीच्या दिवशीच स्वच्छ केले जातात, अन्यवेळी ते धुळखात पडतात. पण या उपक्रमातून आता पुतळ्यांची आणि त्यांच्या परिसराची स्वच्छता नियमितपणे केली जाणार आहे.
🔹 सर्व जाती-धर्मातील नागरिक या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन महापुरुषांच्या शिकवणीवर चालण्याचा आणि सामाजिक एकतेची वज्रमूठ बांधण्याचा संकल्प करतील.

🌸 खासदार निलेश लंके यांचे आवाहन :
“स्वच्छता हीच खरी सेवा आहे. महापुरुषांच्या विचारांचे स्मरण ठेवत आपण त्यांचे पुतळे व परिसर स्वच्छ ठेवू, यातूनच एकतेचा आणि माणुसकीचा संदेश पुढे जाईल.”