सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यामुळे वाचले एकाचे प्राण

खराब रोड मुळे होतात अपघात
शहरातील दूध डेअरी समोर अपघात एक गंभीर जखमी, संजय काका कोठारींची तत्पर मदत दूध डेअरीसमोर रविवारी संध्याकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी झालेल्या अपघातात राम बाबन शिंदे (रा. सौताडा) वय ३२ हे गंभीर जखमी झाले. असून रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडले होते चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे शिंदे रस्त्यावर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. अपघात होताच परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ वाहतुकीचा गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती सर्वप्रथम प्रशांत राळेभात, कॅप्टन लक्ष्मण भोरे,आशु राळेभात यांनी फोनकरून सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी यांना कळवली. माहिती मिळताच कोठारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि स्वतःच्या रुग्णवाहिकेत राम बबन शिंदे यांना थेट रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तातडीच्या धावपळीमुळे शिंदे यांना वेळेत उपचार मिळाले. रक्तस्राव बंद करण्यात आला

दरम्यान, अपघाताची माहिती कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली. असून पुढील तपास पोलीस प्रवीण इंगळे करीत आहे . प्राथमिक चौकशीत हा अपघात वाहनचालकाच्या अतिवेग व बेपर्वाईमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चार चाकी वाहना चा ड्रायव्हरने धडक देऊन डायरेक्ट पसार झाला स्थानिक नागरिकांनी या अपघाताबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या रस्त्यावर वारंवार अपघात घडण्यामागे वाहनचालकांची बेपर्वाई एवढेच कारण नसून रस्त्यावरील दयनीय स्थिती देखील तितकीच जबाबदार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील संथ गतीने सुरू असलेली कामे, अपूर्ण रस्त्यातील खोल खड्डे यामुळे वाहनांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत. या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संजय कोठारी यांनी केली आहे. अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढत राहील आणि नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.