केंद्र सरकारने चालू केलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान आता फक्त याच लोकांना मिळणार.

केंद्र सरकारची असणारी उज्वला योजनेअंतर्गत फ्री मध्ये मिळणारे एलपीजी कनेक्शनचे नऊ कोटी लाभार्थ्यांना सरकार एलपीजी सबसिडी देत आहे आणि इतर लाभार्थ्यांना चे बाजार भाव चालू आहेत त्या बाजारभावाने गॅस सिलेंडर घ्यावे लागणार आहेत असे पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले जून २०२० पासून LPG वर कोणतेही अनुदान दिले जात नव्हते
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे उज्वला योजनेचा अंतर्गत येतात त्यांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
पेट्रोल व डिझेल वरील उत्पादनामध्ये कर कपात त्यांनी केली आहे त्याच बरोबर एलपीजी गॅस सिलेंडर वरही २०० रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना एका वर्षामध्ये गॅसवर 12 गॅस सिलेंडर वर प्रति सिलेंडर २०० रुपये मिळणार आहे.आजच्या भावानुसार 14.2 किलो ची किंमत 100३ रुपये असून पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात बुकिंग झाल्यानंतर केंद्र सरकार २०० रुपये सबसिडी पाठवेल
आपण पाहूया यामध्ये कोणाला अनुदान मिळणार आहे ?
केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या नऊ कोटी लाभार्थ्यांना सिलेंडर फक्त 803 रुपयाला मिळेल. उर्वरित 21 कोटी गॅस कनेक्शन धारकांना एलपीजी सिलेंडर ची किंमत ही बाजारभावाने असणार आहे. बाजारभावाने खरेदी करावे लागणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.