उंबरे गावात 27 वर्षीय विवाहितेचा विनयभंग !
राहुरी तालुका तसं सुजलाम-सुफलाम अनेकदा राहुरी तालुक्यातील अनेक घडामोडी या प्रकाशझोतात येत असतात. राहुरी तालुक्यातील उंबरे या गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र या उंबरे गावामध्ये एका दुधवाल्याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
27 वर्षीय विवाहित तरुणीचा एका दूध घालणाऱ्याने विनयभंग केला आहे त्याचं नाव किरण उर्फ रवींद्र अरुण ढोकणे हे आहे तो उंबरे गावातील असून रोजच्या प्रमाणे तो दुध घालण्यासाठी या तरुणीच्या घरी गेला होता तरुणी दूध घेत असताना त्याने अचानकतिचा हात धरला आणि तू मला फार आवडतेस असं म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत त्याने तिचा विनयभंग केला.
तरुणींने आरडाओरडा करत स्वतःची सुटका केली आणि सासू सासरा आणि दिर यांना याची माहिती दिली तेव्हा तिचा दिर जेव्हा आरोपीच्या त्याच्या घरी जाऊन जाब विचारला कि तू आमच्या वहिणीचा हात का धरला तेव्हा आरोपी किरण उर्फ रवींद्र कोकणे यांनी शिवीगाळ करत तुमची लायकी आहे का माझ्या घरी यायचे असे म्हणतात दगडाने मारहाण केली आणि नंतर त्या प्रकरणी पीडित विवाहित तरुणीने राहुरी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली आणि त्या आरोपी विरुध्द फिर्यादी दिली त्यांनतर आरोपी किरण उर्फ रवींद्र अरुण ठोकणे याच्यावरती भादवि कलम 354 306 आणि 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली तर आरोपी किरण रवींद्र अरुण ढोकणे याचा हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे शोध घेत आहेत.