हृदयद्रावक : १५ दिवसाच्या बाळाला विकून जन्मदात्या आईने टिव्ही, फ्रीज, कुलर खरेदी केले.

आजच्या काळात कोण काय करेल सांगता येत नाही, एका आईने आपले १५ दिवसाचे नवजात बालकाची विक्री केली आहे आणि एवढंच नाही तर ते बालक विकून जे काही पैसे आले त्या पैशाचे तिने घरातल्या काही वस्तू खरेदी केल्या जसे की फ्रिज टीव्ही आणि वॉशिंग मशीन इ. ही घटना मध्यप्रदेश मधील इंदोर या ठिकाणांची आहे. अशा घटनेत आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. एक आई आपल्या मुलाला नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटात तळहाताच्या फोडासारखं सांभाळते त्या बाळाला जन्म दिल्यानंतर ती आई चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कशी काय विकू शकते असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, १५ दिवसाच्या नवजात बाळाला तिने तिच्या पतीच्या संमतीने विकले आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी सहा पोलीस आरोपींना पोलिसांनी अटकही केलेलं आहे.
ही आरोपी महिला इंदोर च्या हिरा नगर भागात राहणारी होती तिचे नाव शाईन बी असे आहे. त्या महिलेने पोलिसांना असे काही सांगितले की, ‘तिच्या नवऱ्याला या मुलाच्या जन्माबाबत संशय येत होता आणि तिचा पती गर्भपात करायचा विचार करत होता पण दिवस जास्त भरल्यामुळे गर्भपात केला नाही मग हे मूल दलालामार्फत विकून टाकू अशी योजना आखली गेली आणि त्यानंतर ते मूल देवास येथील एका जोडप्याला ते विकून टाकले. पोलिसांनी सांगितले की बाळ विकत घेतलेल्या महिलेचे नाव आहे बघा ठाकरे आहे आहे लीना आहे.
लीना ने सांगितले की अलिकडेच तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर ती व तिच्या पतीने या मुलाला साडेपाच लाख रुपयांना विकत घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की मुलाची विक्री केल्यानंतर मिळालेल्या पैशातून महिलेने कुलर टीव्ही आणि वॉशिंग मशीन या वस्तू खरेदी केल्या होत्या त्या जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आली या प्रकरणात आरोपी शाईन बी आणि तिच्या सोबत आणखी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्यापैकी एक अल्पवयीन आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि उर्वरित दोन सध्या फरार आहेत लवकरच या फरार आरोपींना जेरबंद करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे.