उद्या अ.नगर शहरातील या भागात असणार ८ तास बत्ती गुल, पाहा त्यात तुमचा तर विभाग आहे का ?

अहमदनगर शहरांमध्ये उद्या म्हणजेच दिनांक ११ जून २०२२ रोजी शहर वा ग्रामीण भागामध्ये काही दुरुस्त्या व देखभालीचे काही काम असल्याकारणाने काही भागातला वीजपुरवठा खंडित होणार आहे. तरी ग्राहकांनी सहकार्य करावे असे निवेदन महावितरणकडून प्रसिद्ध केले जात आहे.
तर पाहूया उद्या दिनांक 11 जून 2022 रोजी कोणत्या भागात वीज पुरवठा खंडित असेल,
त्यामध्ये बाबुर्डी बेंद, जेऊर, पारनेर, गुंडेगाव, हातमपुरा, स्टेशन रोड, साई नगर, महात्मा फुले चौक, विनायक नगर, कोठी, शांती नगर, सारस नगर, सिव्हिल हॉस्पिटल, ताठे मळा, भुतकरवाडी, बालिकाश्रम रोड, जेऊर, नेप्ती रोड, लींक रोड, मोहिनी नगर, अंबिका नगर, शाहू नगर, भूषण नगर, रुईछत्तिशी, बुरूडगाव, अरणगाव, इंदिरानगर, तसेच विद्यानगर गुंडेगाव उपकेंद्रातील सर्व वाहिन्या व त्यावरील परिसराचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विविध विकास कंपनी मर्यादित अहमदनगर यांनी दिलेली आहे.