नगर ब्रेकिंग : नातवाने केले आपल्या आजोबावर कोयत्याने वार.

अहमदनगर शहरांमधील गुन्हेगारी पाहता अहमदनगर शहर हे जवळ जवळ बिहार होताना दिसत आहे, अहमदनगर शहरांमधून एक वृत्त हाती आले आहे.
नातवाने आपल्या आजोबावरच कोयत्याने वार केलेली बातमी आपल्या अहमदनगर शहरांमध्ये घडली आहे. आणि त्याने फक्त अजोबावरच वार न करता घरातील व्यक्तींवर देखील कोयत्याने वार केले आहेत आणि ही घटना घडली आहे नेवासा तालुक्यातील नारायण वाडी मध्ये. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, गोकुळ मधुकर शिरसागर हा रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर कोयता हातात घेऊन घराच्या दरवाज्यासमोर कोयता मारत होता आजोबा क्षीरसागर यांनी त्याला दरवाजावर कोयता मारण्याचे कारण विचारले. तर त्यावर तो आरोपी गोकुळ म्हणतो की, माझ्या लग्नाला एवढी वर्ष होऊन देखील मला मूलबाळ होत नाही, आता तुमच्याकडे बघतोस तुम्हाला सगळ्यांना मारूनच टाकतो. असं बोलून त्याने आजोबांच्या तोंडावर कोयत्याने सपासप वार केले.
या अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये ते अत्यंत गंभीर जखमी झाले आणि त्या आजोबांना सोडवण्यासाठी त्याचे चुलते बाबासाहेब क्षिरसागर चुलती स्वामी स्वाती क्षिरसागर चुलत भाऊ विश्वास क्षिरसागर आले असता या आरोपी गोकुळने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले आणि त्या सगळ्यांना जखमी केले या सगळ्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या आरोपीस अटक केली आहे. पाहूया पोलीस पुढे त्या आरोपीवर काय कार्य करतात कारवाई करत