मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत अखेर ठाकरे बोललेच !!
कालपासून आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यांची उलथापालथ होत आहे ती अविश्वसनीय आहे. अचानक पणे झालेला हा बदल सगळ्यांना विचार करायला लावणारा आहे. अचानकपणे निवडणुका काय होतात आणि त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना सोडून महाराष्ट्राबाहेर निघून जातात. तसेच त्यांच्यासोबत आणखी आमदारही जातात हा सगळा बदल किंवा अशा काही घटना या सर्वसामान्यांसाठी लगेच विश्वास बसेल अशा नाहीये. शिवसेनेचे विश्वासू नेते हे एकनाथ शिंदे असून त्यांनी जो काही बंड पुकारला आहे त्याने पूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे.
आज मुख्यमंत्री यांनी फेसबुक द्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये जो काही गोंधळ चालु आहे त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी भाष्य केले त्यावेळी जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले की आपण एक क्षणाला मुख्यमंत्रीपद सुद्धा सोडायला तयार आहे पण ते सांगायला शिवसैनिकांनी समोर यावं असा आवाहनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यासोबत ते असेही म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीचे लोक म्हणाले असते की उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री म्हणून नको तर ठीक होतं! पण मला या गोष्टीचे दुःख वाटते की माझ्या लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको आहे. इकडे तिकडे गुजरातला किंवा सुरत ला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर या आणि सांगा तुम्ही नालायक आहात तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको आहात मी लगेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल.
राज्यात सत्तेवर काय गोंधळ सुरू आहे त्यावर ते आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. अगदी काही मिनिटांसाठी मनोगत होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल नाराज आहे. त्यांचा आवाज वेगळा येतो किंवा ते दुखावले गेले आहेत त्यांनी सुरुवातीला स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की, मला कोरोना झाला आहे आणि त्याचेच हे परिणाम होते जेणेकरून माझा आवाज बदलला, ऐकायला मिळत होता. पुढे जाऊन असेही म्हणत होते की, मी मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नको असेल तर मला काही वाटलं नसतं किंवा ते योग्य आहे. मात्र मी माझ्याच माणसांना मुख्यमंत्री म्हणून नको आहे त्यामुळे याच जास्त दुःख आहे असे त्यांनी म्हटले. पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना यात फरक आहे पूर्वीची शिवसेना उरली नाही असे आरोप प्रत्यारोप केले जातात आणि म्हणून आमदार फुटले आहेत असं म्हटलं जातं. यावरती ठाकरे म्हणतात की, आत्ताच्या आमदारांना ज्यांनी आमदार गेले ते आत्ताची शिवसेना आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात निवडून आलेले नाहीयेत त्यांना जे काही दिला आहे ते आत्ताच्या शिवसेनेने दिला आहे आणि ते आत्ताच शिवसेनेबद्दल असं वागत आहेत याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.
पुढे जाऊन ते म्हणतात की, तुमचे म्हणणे आहे ते तुम्ही माझ्याकडे येऊन मांडायचं होतं यासाठी गुजरातला गुवाहाटी ला जायची गरज नव्हती. मी तुमचं म्हणणं ऐकलं असतं, माझ्यावरती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत, शिकवण आहे त्यामुळे मी मोहात न पडता मी उद्या देखील वर्षा बंगला खाली करू शकतो असेही ते म्हणाले. त्यांच्या कार्यक्रमाबद्दल देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बातचीत केली आहे ते म्हणतात की, माणसाला स्वीकारायला आव्हानात्मक होतं मी ते पूर्ण करतो. मी माघार घेत नाही त्यामुळे मला नेतृत्व करायला सांगितलं. महा विकास आघाडी सरकारचे नेतृत्व करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये यशस्वी झालो. अगदी काही महिन्यांपूर्वी उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून देखील पहिल्या पाच मध्ये त्यांचं नाव आलं होतं. त्याबद्दल देखील त्यांनी जनतेचे आभार मानले या सगळ्या गोष्टी घडत असताना पुन्हा एकदा दुःखाची बाब म्हणजे शिवसेनेमध्ये होणारा हा बंडखोर, यावरती ते म्हणतात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मी नको असेल तर मला पटलं असतं मात्र माझ्याच लोकांना मी नकोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मला जाहीर पाठिंबा दर्शवला आम्ही तुमच्यासोबत आहोत असे देखील त्यांनी मला भ्रमणध्वनी फोन करून सांगितलेला आहे. मात्र माझ्याच लोकांना मी नको असेल तर काय करावे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर बंडखोर आमदारांना म्हणतात कि, आमदारांनी इकडे माझ्याकडे मातोश्रीवर माझ्याकडून राजीनामा पत्र घ्या आणि खुशाल राजभवनावर ते जावं असं भावनिक आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे काळामध्ये शिवसेनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आणि आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचं पुढच बंडखोरीचं नाट्य काय असेल याचे पडसाद उमटतील याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष!