पत्रकार परिषदेत शरद पवार बंडखोरांबद्दल बोलले अस काही !!
दोन दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारण आपण सर्वजण पाहतो आहोतच. शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात जो काही बंड पुकारला आहे तो अविश्वास होता. आता झालेल्या निवडणुकांनंतर अचानकच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन महाराष्ट्र राज्य सोडून सूरत ला रवाना होतात आणि त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काही अटी ठेवतात त्याआधी उद्या ठेवून ते शिवसेनेला एक प्रकारे विरोध दर्शवतात व त्यांच्या म्हणण्यानुसार चालावे एक प्रकारे अशी सूचना शिवसेनेचे अध्यक्ष ठाकरे यांना एकनाथ शिंदे देतात
एकनाथ शिंदे हे ट्विट करतात त्यामधील एक वाईट गोष्ट म्हणजे माझ्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदाराची साथ आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझे म्हणणे मान्य करावे लागेल माझी बाजू वरचढ असल्याने असणार आहे त्यासोबत ते असेही म्हणतात की माझ्या सोबत मी इतर आमदार जरी घेऊन गेलो तरी मी शिवसेनेचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि यांचे हिंदुत्व त्याविरुद्ध जाणार नाही कालही माझे बाळासाहेबांचे हिंदुत्व होते आणि यापुढेही बाळासाहेबांचे हिंदुत्व राहणार आहे मला विकास आघाडी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षासोबत युती मान्य नाही शिवसेनेने यापुढे युती करताना भाजप सोबत करावी व या पुढचे अडीच वर्षे भाजपा आणि शिवसेना यांनी मिळून सत्ता करावी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ते पत्रकारांशी बोलताना म्हणतात कि, शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवारांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओचा दाखला देत राष्ट्रीय पक्षांची यादीच वाचली. त्यातून शरद पवारांनी सध्याच्या या राजकीय घडामोडींमागे भाजपच असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं.
त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचं फक्त कारण दिलं. छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत 12 ते 15 जण होती. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं असं शरद पवार म्हणाले.