ब्रेकिंग : नारायण राणेंची शरद पवार यांना धमकी.
शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी जो बंड केला आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जे तापमान तापले आहेत हे आपण सगळे पाहत आहोत. या राजकारणाच्या वाद विवादामध्ये यामध्ये आता भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे त्यांनी एक ट्विट केला आहे त्यांनी ट्विट करत थेट माननीय शरद पवार साहेब यांना इशारा दिला आहे. ट्विट करत राणे म्हणतात की, माननीय पवार साहेब या सगळ्या धमक्या देत आहेत. सभागृहांमध्ये येऊनच दाखवा. ते तर येणारच आहेत आणि नक्की येणार त्याच प्रमाणे ते त्यांच्या मनाप्रमाणे मतदान देखील करणार आहेत आणि या वेळेस जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्हाला घर काढणे कठीण होईल असा प्रत्यक्ष इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाव न घेता शरद पवार यांना दिला आहे.
शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी जो बंड केला आहे आता बंड केल्यामुळे महा विकास आघाडीचे सरकार आहे तर ते आता टिकणार नाही. विधानसभेतील बहुमत सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास शरद पवारांनी केला होता केला आहेत त्यांना संबोधित म्हणाले की, त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावे लागेल. तसेच आमदारांना बंडखोरीचे परिणाम भोगावे लागतील असं शरद पवार म्हणाले
नारायण राणे बोलत असताना म्हणतात की, महाविकासआघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण झालेले आहे आणि यांनी कामाच्या व त्यांच्या कार्याच्या बडाया तर अजिबात मारू नये. बऱ्याच जणांनी अनेक वेळा बंडखोरी देखील केली आहे त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. नको त्या क्षणाला आणि नको त्या वयामध्ये मान्यवरांना या अशा धमक्या देणे शोभत नाही आणि हे बोलत असताना त्यांनी संजय राऊत यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचे नाव घेत ते म्हणतात की, संजय राऊत आता तुमच्या शिवसेनेचे किती आमदार राहिले आहेत ? आता तुम्ही मतदानाची अपेक्षा काय करताय तुम्ही अपेक्षा करा ती फक्त पराभवांची अशी खोचक टीका त्यांनी दिली आहे