” कब तक छिपोगे गुहाटी मे, आना हि … ” संजय राऊत.
गेल्या दोन चार दिवसापासून राजकारण तापलेले आहे हे आपण पाहत आहोतच. यामागचे कारण म्हणजे शिवसेनेचे नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही आपल्याच पक्षाच्या विरोधात जाऊन बंड पुकारला आहे त्यामुळे शिवसेना पक्षापुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. यामध्ये वादविवाद उत्तर मृत्युदर चालूच होते त्याचप्रमाणे आरोप-प्रत्यारोप ट्वीट करणे देखील चालू होते. हे सर्व चालू असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बऱ्याच वेळा जे बंडखोर आमदार आहेत त्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी आवाहन केले. त्याच बरोबर त्यांनी एक ट्विट केला आहे, ‘ कब तक छिपोगे गुहाटी मे, आना ही पडेगा चौपाटी मे ‘अस म्हणत त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा फोटो ट्विट केला आहे.
मध्यंतरी सोशल मीडियावर शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी ‘ काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ती हाटील एकदम ओके ! असं म्हणाले होते त्यांच्याच वक्तव्याचा धागा पकडून राऊत यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता दिली, पण एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचा दावा केला आहे. यांनी शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे एवढेच नाही तर महाविकास आघाडी ने विश्वासदर्शक ठराव जिंकणार असा विश्वास व्यक्त करून शिंदे यांच्या गटाला मुंबई येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात उपाध्यक्ष झिरवळ यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
चार्टर विमाने, गाड्या, हॉटेल यावर खर्च लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली सुरू आहे इथे एक लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना सोडून छगन भुजबळ, नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. एकनाथ शिंदे तरी होतील का शिवसेनेत राहून मुख्यमंत्री होण्याची खात्री जास्त होती. 40 हजारांची फौज त्यांच्या बरोबर आहे या आकड्यात पैशाला चटावलेल्या बाजार बुणगे जास्त दिसतात. ED च्या भीतीने वर्षानुवर्षाच्या निष्ठा विकणारे उद्या श्री शिंदे यांना सोडूनही पळ करतील असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.