ब्रेकिंग : त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला.

राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं होत, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- येवढे वर्षे आम्ही बोलत होतो पण आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमुक्त केलं आहे.
- स्वत: शिवसेनाप्रमुखांनी जे नाव ठेवलं ते नाव आपण संभाजीनगरला दिलं आहे.
- पुढची वाटचाल सगळ्यांच्या आशिर्वादाने सुरू राहील. नामांतरावरून मला आनंद वाटला.
- एखादी गोष्ट चांगली सुरू असली की त्याला दृष्ट लागते.
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवेसनेचे ४ मंत्री उपस्थित होते. ज्यांना मोठं केलं ते आज विसरले. शिवसेना काय आहे. ते अनुभवत आलोय.
- साधी साधी माणसं आम्हाला प्रोत्साहन देत राहिली. ज्यांना दिलं ते नाराज आहेत, ज्यांना नाही दिलं ते खूष आहेत.
- बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं आहे.
- कोर्टाने निर्णय दिला आहे, आता न्यायालयाचा मान राखला पाहिजे, उद्या बहुमताला सामोरं जावं लागणार आहे, लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे.
- लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार मानतो
- काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी पण बैठकीनंतर सांगितलं की तुम्ही नाराज होवू नका आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो.
- केंद्राच्या सूचनेवरून मुंबईत सुरक्षा वाढवली जातेय. उद्या चीन सीमेवरील सुद्धा सुरक्षा मुंबई येईल याची लाज वाटते. एवढी लाज सोडली.
- उद्या लोकशाही जन्माला येतीय. त्याचा पाळणा हलतोय.
- उद्याच्या शिवसैनिकांना कुणीही आडवं येवू नये. तुम्हाला कोणीही अडवणार नाही.
- उद्या शिवसेनाप्रमुखाच्या पोराला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांना लाभणार आहे. मला पद जाण्यातची खंत अजिबात नाही, बहुमतामध्ये मला रस नाही.
- मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे.
“एखादा वडाला घुबडा सारखा चिटकुन बसणारा मी नाही आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो अस ते म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी घडत आहेत या घडामोडींवर फुल स्टॉप लागलेला आहे. शिवसेनेने मधूनच काही बंडखोर नेते हे गुहाटीला पोहोचले आहे तर शिंदे गट वेळा पडलेला आहे आणि त्यामुळेच ठाकरे सरकार अल्पमतात आलं उद्या फ्लोर टेस्ट होऊन बहुमत सिद्ध करण्याचा पर्याय सुचवण्यात आला होता मात्र त्यास पूर्वी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील यांनी राजीनामा दिला.