दिलासादायक : गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त.

राज्यात नव सरकार स्थापन झाला आणि जनतेला आनंदाची बातमी मिळाली आहे केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली. तब्बल २०० रुपयांना गॅस सिलेंडर आता स्वस्त होणार आहे अशी बातमी समोर येते. पहिली तारीख आणि पहिलाच दिवशी अत्यंत आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या खिशाला झळ कमी पोहोचणारे दिवसेंदिवस इंधनांचे दर वाढतात आणि त्यामुळे इंधनाच्या निगडित असणाऱ्या सर्वच बाबींचे दर वाढत आहेत. यात गॅस सिलेंडर गगनाला भिडलं होतं याच गॅस सिलेंडर मध्ये आता दोनशे रुपयांनी घट होत असल्यामुळे आनंद व्यक्त केला जातो.
सिलिंडरच्या किंमती?
- 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून 200 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
- दिल्लीत आता 19 किलोचा सिलेंडर 2219 ऐवजी 2021 रुपयांना मिळणार आहे.
- कोलकातामध्ये 2322 रुपयांऐवजी 2140 रुपयांना मिळणार आहे.
- मुंबईत 2171.50 रुपयांऐवजी 1981 रुपयांना मिळणार आहे.
- चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 2373 रुपयांऐवजी 2181 रुपयांना मिळणार आहे.
दैनंदिन जीवनाची गरज म्हणजेच गॅस सिलेंडर आहे. अगदी प्रत्येक गोष्टीसाठी गॅस सिलेंडरची गरज भासते आणि शिजवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कार्य गॅस सिलेंडर बजावत असतं. आणि याच गॅस सिलेंडरचे दर कमी होत असल्यामुळे आनंद व्यक्त केला जातो.
उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत खेड्यापाड्यात गावांमध्ये गॅस कनेक्शन पोहोचले. अगदी स्वस्तात मस्त गॅस घराघरात पोहोचला आणि त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला. पूर्वी चूल पेटवून जेवण बनवावं लागत होतं, त्यासाठी लाकडं गोळा करणे त्यानंतर धुरामुळे होणारे आरोग्यावरती हानिकारक परिणाम या सगळ्या समस्यांना फाटा देत उज्वला गॅस योजनेअंतर्गत घराघरात गॅस पोहोचला. त्यामुळे महिला वर्गांमध्ये देखील आनंद व्यक्त केला जात आहे याच उज्वला गॅस सिलेंडर बद्दल देखील सबसिडी सुरू होण्याची बातमी समोर येते.
गॅस सिलेंडर स्वस्त झाल्यानंतर ग्रामीण भागात देखील यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे कारण की गॅस सिलेंडरचे दर हे हजारापेक्षा वरती गेले होते. आणि त्यामुळे नागरिक हवालदिल झाले होते गॅस सिलेंडर ही दैनंदिन वापरांना आतली गोष्ट आहे त्यामध्ये वापरही जास्त होतो मात्र महाग असल्यामुळे कधी कधी जपूनही वापर करावा लागतो. मात्र आता याचे दर कमी झाल्यामुळे किंचितसा फरक हा घरातलं जे नियोजन आहे जे आर्थिक गणित आहे त्यावरती होणार आहे.