धक्कादायक ; पुणे रेल्वेस्टेशन बॉम्बने उडवले जाणार ?

विद्येचे माहेरघर म्हणून पुणे या शहराची ओळख आहे. मात्र दिवसेंदिवस पुण्यात देखील गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळतील. अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यामध्ये असं काय घडलं ज्यामुळे पुणे पुन्हा एकदा हादरले. पुण्यातील महत्त्वाचं असणाऱ्या आणि वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पुणे या ठिकाणी बाहेरगावातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, अनेक जण नोकरीसाठी देखील पुण्यामध्ये स्थायिक झाले, तर काहीजण तर मुंबई ते पुणे दररोजचा प्रवास करून आपली नोकरी करतात. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेचे प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर नव्याने सुरू होणाऱ्या मेट्रोमुळे देखील पुण्यामध्ये आता वरदळ वाढली. त्यामुळे या ठिकाणी सतत लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते आणि यातच असा अनुचित प्रकार घडला त्याला जबाबदार कोण राहील आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हानीहोऊ शकते. या धमकीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत यातील जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडण्यात या पोलिसांना यश आलं.
पुण्यामधील पुणे रेल्वे स्टेशन येथे बॉम्बस्फोट घडवणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी जलद गतीने तपास चालू केला. आणि यामध्ये त्यांनी गुगल व्हाईस सर्च करून पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधून ज्या आरोपीने फोन करून धमकी दिली होती, तो प्रभू कृष्णा सूर्यवंशी ( वय 22 मूळ हाडसनी तालुका हदगाव जिल्हा नांदेड ) असे त्याचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या सूर्यवंशी वर अशाच प्रकारे वरिष्ठ उच्च पदस्थ पदाधिकारी व राजकीय नेते, मोठे उद्योगपती यांना देखील कॉल करून त्याने असाच त्रास दिला आहे. त्याच्यावर गावदेवी पोलीस स्टेशन व वजीराबाद पोलीस स्टेशन या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत.
पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशनच्या धमकीचा फोन आल्याने पोलिसांची एकच धावपळ झाली. धमकीच फोन येतात पोलीस प्रशासनाने पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त वाढवला त्याचप्रमाणे वेटिंग रूम, रेल्वे ट्रॅक, व स्टेशन वरील सर्व पार्किंग हि तपासले गेले. त्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनवर 13 मे रोजी स्फोटक सदृश्य वस्तू मिळून आल्या होत्या. त्यामुळे हा धमकीचा फोन येतात संपूर्ण प्रशासन कामाला लावले गेले. व शेवटी आरोप्याला पकडण्यात यश आले.