अभिमानास्पद : एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा मिळवतो हे पद !!

इतर मुलांप्रमाणे गरीब घरातली मुले देखील स्वप्न पाहत असतात. आणि त्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांची पालकही त्याप्रमाणे त्यांच्या स्वप्नांना आधार देत असतात. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसे काबाडकष्ट करत असतात. जर आपला आत्मविश्वास प्रबळ असेल तर आपण ठरवलेले ध्येयापर्यंत आपण नक्की पोहोचतो. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या वाटेवर कितीही आव्हान आली तरी, आपण त्या आव्हानांवर मात करत पुढे चालत असतो. प्रत्येकाचे एक ना एक ध्येय असते आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी या जगतातला प्रत्येक माणूस हा रात्रंदिवस मेहनत करत असतो. आपण ठरवलेले ध्येय साध्य करणं म्हणजे एवढं सोपे नसतं, त्यासाठी कष्टही तेवढीच लागतात. ध्येय साध्य करत असताना जो माणूस त्याच्या यशाच्या मार्गातील येणारे अडथळे यांवर मात करतो, तो त्याचं ध्येय नक्की साध्य करतो. आणि ज्याला त्याच्या मार्गात अडचणी येतात त्याला त्या मात करता येत नाहीत ते त्या ध्येयापासून विचलित होतात. त्या ध्येयाबाबतीत ते नाराज होतात व त्या ध्येयापासून ते भरकटले जातात. पण या जगात काही लोक अशी देखील आहेत की, त्यांच्याकडे असलेला आत्मविश्वास व कठोर परिश्रम या दोन्हीची सांगड घालून आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करतात.
बऱ्याचदा काही पालकांची परिस्थिती ही गरीब असते, तरीदेखील त्यांचं दैनंदिन जीवन जगत असताना ते आपल्या मुलांना उत्तम शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्या मुलांनी चांगले शिकून चांगल्या पदावर बसावे व नाव कमवावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. आज आपण ज्या मुलाबद्दल बोलणार आहोत तो मुलगाही एका सफाई कामगाराचा आहे ज्याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
ही गोष्ट एका सफाई कामगाराची ज्याने दहा वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहण्याची हिंमत केली. त्या कामगाराची लोक खिल्ली उडवायचे, त्यावर हसायचे. पण या सफाई कामगारांनी ठरवलं होतं की, आपला मुलगा हा भारतीय सैन्यात भरती करायचा आहे आणि यासाठी त्या कामगाराने कधी हार मानली नाही. आज त्या सफाई कामगारांचा मुलगा भारतीय सैन्यात अधिकारी झाला आहे. ज्याची कालपर्यंत थट्टा उडवली जायची आज त्याच्या गावातील लोक त्याचे अभिनंदन करत आहेत.
ही गोष्ट सफाई कर्मचारी बिजेंद्र कुमार यांची आहे या बिजेंद्रने काही लोकांसमोर असं म्हटलं होतं की, ” आज मी झाडू उचलला आहे पण माझा मुलगा एक दिवस बंदूक उचलेल आणि या देशाची सेवा करेल.” त्याच्या या वाक्यावर लोकांना हसू आले आणि त्याला सांगितले की, बाबा रे एवढा मोठा विचार करू नकोस. त्यावेळेस बिजेंद्रने कोणाचीही परवा केली नाही. लोकं काय म्हणतील किंवा काय नाही म्हणणार पण आपल्या मुलाला सैन्यात भरती करायच. लोकं मस्करी करत असायचे पण त्याने कोणाच्याही बोलणे कडे लक्ष दिले नाही. आपल्या मुलाला राजस्थानला शिक्षणासाठी पाठवले व आपल्या मुलाला अधिकारी करण्यासाठी जीवाचे रान केले आणि तसेच शक्य होईल तेवढे सर्व प्रयत्न आपल्या मुलासाठी केले. आज त्या बिजेंद्रच्या डोळ्यांमध्ये जे अश्रू आहेत ते दुःखाचे नसून ते आनंदाश्रू आहेत.
विजेंद्र चा मुलगा सुजित हा 21 वर्षाचा असून, सुजितने इंडियन मिलिटरी अकादमी देहरादून मधून पदवी घेतली आहे. या सुजित ने भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी होऊन वडिलांचे नाही तर गावाचे नाव देखील उज्वल केले आहे.