बाप रे ! पाहा शेतीचा वाद किती विकोपाला गेला.

गाव म्हणजे की पहिले आपल्या ध्यानात येते ते म्हणजे शेती आणि शेती म्हटलं की आलं बांधावरून होणार भांडण. गावामध्ये शेती वरून किंवा शेतीच्या बांधावरून बऱ्याचदा आपण भांडण होताना पाहिला आहे. आणि हे भांडण कधी कधी मारामाऱ्या, खून इथपर्यंत ही जात. असंच एक प्रकरण अंधेरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या काठोडा येथे घडले आहे. येथे शेतीच्या वादामुळे झालेल्या हाणामारी मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार 2 जुलै रोजी घडल्याचे समजले आहे. या हाणामारी मध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी आरोपींवर खुणाचा गुन्हा दाखल केला आहे.
तसेच सात आरोपींना अटक देखील केला आहे. शेतीचा वाद इतका जास्त टोकाला पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. या शेतीच्या वादामुळे झालेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झालाय. आणि याबाबत आणखी तपास पोलीस अधिकारी करत आहेत. शेतीच्या वादामुळे मृत झालेल्या महिलेचे नाव कृषीवर्ताबाई धुड असे आहे. या वादामध्ये त्या महिलेचा मृत्यू होतो पण नातेवाईकांनी या मृत झालेल्या महिलेच्या प्रेताला ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना त्या आरोपींना अटक केलं जात नाही तोपर्यंत मृतक कशावरताबाई यांच्या मृतदेहाला आम्ही हात लावणार नाही. असं म्हटल्यामुळे या परिसरामध्ये एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या वृद्ध महिलेचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी जेव्हा नकार दिला तेव्हा त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करत तात्काळ तपास पूर्ण करून या घटनेतील सर्व आरोपींना अटक केली. सर्व आरोपींना अटक केल्यानंतर नातेवाईकांनी त्या वृद्ध महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.