राजकारण : डोळ्यात डोळे घालून बघायला आपण तेवढ प्रामाणिक असाव लागत आदित्य ठाकरे !!
शिवसेनेचे जे व्हिप होते ते शिंदे गटाने मान्य केले नाही व शिवसेना विरोधातच त्यांनी मतदान केले. आज येताना पोलिसांच्या संरक्षणामध्ये शिंदे गट आला कुठल्याही मीडियासोबत बोलून दिले नाही.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बंड करून आमदार आधी सुरतला तळ ठोकतात. तर त्यानंतर आसाममधील गुवाहाटी मध्ये काही दिवस राहतात व ११ दिवसांनी बंड करणारे हेच आमदार रात्री मुंबईमध्ये दाखल होतात. व ते आज रविवारी विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी विधिमंडळामध्ये पोलीस संरक्षणामध्ये येतात. यामध्ये त्यांनी शिवसेनेचा जो व्हिप असतो तो नाकारून भाजपला मतदान केले.
११ दिवसांनी समोर आलेले बंडखोर आमदारांकडे आदित्य ठाकरे यांनी बघितले असता आमदार आदित्य ठाकरेंकडे बघू देखील शिकले नाहीत अशा वेळेस ती इकडे तिकडे व खाली माना घालून आदित्य ठाकरे यांच्या समोरून जातात असं पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणतात की, बंड आमदारांकडे मी बघितलं पण त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत नाही केली. जर आपण केलेल्या कामाशी आपण प्रामाणिक आहोत आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही. अशा वेळेस आपण समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ शकतो. पण आपले कामच कूटनीतीचे असेल तर आपण एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहणार तरी कसं ? माझं ठीक आहे पण त्या शिवसैनिकांचं काय ज्यांनी विश्वास ठेवून यांना मतदान केलेले असते
आणि आज जेव्हा हे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या स्वतःच्या पक्षाशी प्रामाणिक न राहता त्यापक्षासोबतच बंड करतात आणि दुसऱ्या सोबत निघून जातात. हेच बंडखोर आता जेव्हा स्वतःच्या मतदारसंघांमध्ये जातील तेव्हा यांची परिस्थिती काय असेल ? ते आपल्या मतदारसंघांमध्ये जातील तेव्हा शिवसैनिकांच्या डोळ्यात कसे बघतील ? त्या शिवसैनिकांना काय उत्तर देतील ? असा प्रश्न शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आज ते आमदारांची नैतिक परीक्षा पार पडली ते सर्वजण खाली व इकडे तिकडे बघत होते त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले नाही मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना काय सांगणार आणि त्यांच्यासमोर कसे जाणार असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी विचारला