‘ या ‘ गावाच्या प्रेमाने खाकीतल्या सिंघमला केले भावूक.

विजय चौधरी – प्रतिनिधी औरंगाबाद
सोयगाव दि.०४……
आयुष्यभर पुरेल एवढी सोयगावकरांच्या प्रेमाची शिदोरी मी माझ्या सोबत घेऊन जात आहे आणि सोयगाव करांचे माझ्यावरील प्रेम हे कधीच न विसरण्यासारखे आहे गेल्या अडीच वर्षात मला मिळालेलं सोयगावकरांचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी कमाई असल्याचे सोयगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम सिरसाठ यांनी बचत भवन सोयगाव येथे आयोजित निरोप सभारंभादरम्यान बोलतांना व्यक्त केले यावेळी ते भावुक झाले होते
सुदाम सिरसाठ यांनी केलेले कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य, अतिवृष्टीमध्ये रात्रीपरात्री धावून जाऊन केलेली नागरिकांना मदत ,कोरोना काळात गरजूंना केलेली किराणा सामानाची मदत तसेच फिर्यादी-आरोपी यांना व्यवस्थित समजावून सांगण्याचे केलेले कार्य यामुळे सुदाम सिरसाठ साहेब यांनी सोयगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सोयगाव शहरासह प्रत्येक खेड्यापाड्यात, गाव वस्तीत पाडली आहे
त्यांच्या अचानक बदलीच्या निरोपाची बातमी कळतात सोयगावकर भावुक झाले होते खाकी वर्दीतील माणुसकी खऱ्या अर्थाने सुदाम सिरसाठ यांच्यात बघायला मिळाली अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे
पोलीस सहायक निरीक्षक सुदाम सिरसाठ यांची बदली सोयगाव शहरातून चिखलठाणा झाली त्या निमित्ताने त्यांचा बचत भवन येथे सपत्नीक सत्कार सभारंभ आयोजित करण्यात आला यावेळी सर्व पोलीस बांधव, पोलीस पाटील संघटना, व्यापारी वर्ग ,पत्रकार, शिक्षकवर्ग,सरपंच, उपसरपंच, सोयगाव शहरातील नागरिक, खेड्यापाड्यातुन आलेल्या सर्व चाहत्यांनी सुदाम सिरसाठ यांचा सपत्नीक सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडीत, जमादार,राजू बर्डे,संतोष पाईकराव, ज्ञानेश्वर सरताळे, सागर गायकवाड,दिलीप तडवी, विकास दूबिले, श्रीकांत तळेगावकर,रविंद तायडे,सुहास पाटील,नारायण खोडे, दिलीप पवार व होमगार्ड योगेश बोखारे, ऋषी काळे, विशाल घन यांच्यासह इतर महिला पोलीस कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती यावेळी एमआयएम तालुका अध्यक्ष अखिरदादा, पत्रकार राजुभाऊ दुतोंडे, मुख्याध्यापक आनंदा इंगळे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सरताळे ,नारायण खोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या……