जमिनीची वाटणी मागितली म्हणून सख्ख्या भावासोबत केलं असं काही.
सख्खा भाऊ पक्का वैरी असं म्हटलं जातं अशा घटनाही घडत असतात आणि भावा भावांचे वाद हे अनेक गोष्टींवरण होत असतात. यामध्ये कौटुंबिक काही वाद असेल, काही घराणे शाहीचे वाद असेल, काही प्रतिष्ठेचे वाद असेल आणि काही अगदीच प्रॉपर्टीचही वाद असतात. जेव्हा दोन किंवा तीन भावांमध्ये वाद सुरू होतात तेव्हा आई-वडील व्याकूळ होतात. आई-वडिलांना सुचत नाही जी मुलं आपण लहानाची मोठी केली त्याच मुलांमध्ये अशा पद्धतीने वाद सुरू आहे. आई-वडील हतबल होऊन जातात आणि आई वडील या ठिकाणी आपल्याच मुलांना शरण येतात. अगदी पै पै करून आपल्या मुलांसाठी त्यांच्या पुढील भविष्यासाठी ते सगळी कमाई करत असतात. आणि त्यानंतर याच कमाई साठी ही मुलं वाद करत असतात. अशीच सख्या दोन भावांच्या मारहाणीची घटना आहे. कसबा ताराळे या ठिकाणी सख्या धाकट्या भावाचा अगदी चार दिवसांपूर्वीच थोरल्या भावानं जमिनीची वाटणी मागतो आणि दारू पितो म्हणून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली प्रकाश विठ्ठल पाटील वय वर्ष 38 असं मयत भावाचं नाव आहे. तर रात्री संशयित आरोपी धोंडीराम विठ्ठल पाटील वय वर्ष 44 याला पोलिसांनी अटक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर सविस्तर माहिती समोर आली त्यामध्ये धोंडीरामच्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली स्वतः धोंडीराम आणि मयत भाऊ प्रकाश शिक्षा झाली होती शिक्षा संपल्यानंतर ते गावी येऊन रोजगारांसाठी कागल या ठिकाणी राहत होते. दरम्यान वडील आणि आईचे निधन झालं. आणि हे कुटुंब उध्वस्त झालं गेल्या 30 जून पासून शेतीचे पैसे बँकेतून दोन भावांनी घेतले आणि तिथेच घरात दोघांनी मुक्काम केला. त्या रात्री प्रकाश हा दारू पिऊन आला शेतीची वाटणी मागू लागला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या थोरल्या भावानं लाकडी दांडक्यानं त्याला मारून त्याचा खून केला. यांच्या घरात नेमका वास का सुरू आहे असा संशय आल्याने चुलत भावाने बघितलं त्याला दुर्गंधी जाणवू लागली अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. राधानगरीचे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना घरातील शिरल्यानंतर प्रेत दिसलं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटला नव्हते प्रेत सडला होता. तपासणीसाठी प्रेताला रुग्णालयात नेण्यात आलं. अंत्यविधीसाठी जवळच्या नातेवाईकांकडे सोपवलं आणि त्यानंतर खून करणारा आरोपी थोरला भाऊ धोंडीराम याला पोलिसांनी अटक केली.
धोंडीराम च्या पत्नीचे हत्या केल्याच्या आरोपाखाली धोंडीराम आणि भाऊ प्रकाश हे दोघेजण शिक्षा भोगून पुन्हा आपल्या घरी परतले. आई-वडिलांचे निधनानंतर त्यांनी घराला कुलूप लावला आणि ते दोघेही कागल या ठिकाणी राहण्यासाठी गेले त्या दोघांना दारूचे व्यसन होते असे माहिती समोर येते. 30 जून रोजी दोघेही शेतीच्या पैशासाठी आले होते जमिनीच्या वाटणीचं कारण पुढे येते प्रकाशचा लाकडी दांडक्यानं घाव करून त्याचा खून करण्यात आला. परंतु हा खून धोंडीराम न दारूच्या नशेत केल्याची चर्चा आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजयसिंह घाडगे हे करतायेत.
संपत्तीसाठी दोन रक्ताचे नाते असणारे भाऊ या दोघांमध्ये इतकं मोठं वार आलं की अगदी टोकाचे पाऊल उचलत नशेच्या भरात आणि जमिनीच्या वादातून आपल्या सख्या लहान भावाचा खून केल्याचे अत्यंत हृदय द्रावक अशी घटना घडली.