…काल माईक खेचला, पुढे पहा काय काय खेचतील ? – उद्धव ठाकरे.
शिवसेनेतून बंडखोर आमदार गेल्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि दहा दिवसाच्या राजकीय घडामोडीनंतर सत्ता स्थापन झाली. शिंदे गट आणि भाजपा यांची ही सत्ता स्थापन झाली. काल विधानसभेत त्यांना बहुमत देखील मिळालं 164 मतदारांच्या भक्कम पाठिंबा वरती पारदर्शक ठराव मंजूर झाला. आणि त्यातून शिंदे गट आणि भाजपाचे हे नव सरकार उभ राहिलं या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदांचा पदभार स्वीकारला.
ठाण्याचे असणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री या पदावरती विराजमान झाले. त्यानंतर राज्यात अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आला त्यामध्ये एकनाथ शिंदे हे रिक्षाचालक होते म्हणून राज्य हे रिक्षाचालकाच्या हातात दिलं का आशा चर्चा रंगू लागल्या. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरती प्रतिक्रिया दिल्या.
ते म्हणतात काल विधानसभेत काय घडलं ते आपण पाहिलं रिक्षावाल्यांची रिक्षा सुसाट धावली होती. या रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक घेतला. पुढच्या काळात काय काय खेचले हे त्यांना कळणार सुद्धा नाही. असा तिरकस बांध त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
शिवसेना भवनात महिला संघटक, संपर्कप्रमुख, संघटक यांची बैठक पार पडली, अनेक महिला पदाधिकारी यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या शिवसेनेच्या रणरागिनी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करतील अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या भावना ऐकून उद्धव ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. कोणाला कोण गेलं मला फरक पडत नाही ज्यांना लढायचं असेल त्यांनी माझ्यासोबत राहावं आणि पुन्हा जोमाने शिवसेनेला उभा करू असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेतून बंडखोर आमदार निघून गेल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी पोकळ निर्माण झाली आहे. आणि हीच पोकळी भरून काढण्याचं मोठं काम आता शिवसेनेवरती आहे आणि प्रत्येक शिवसैनिकावरती आहे. दहा दिवसाच्या राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारने विधानसभेत बहुमत जिंकलं आणि अभिनंदन केलं त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. पावणे दोन तासाचा हे भाषण होतं हे सत्तांतर कसं घडलं या नात्याचा जणू काही त्यांनी भाष्यच केलं असं काही म्हणायला हरकत नाहीये. याच पार्श्वभूमी वरती शिवसेना पक्षप्रमुख यांनी शिंदे आणि फडणवीस यांना टोमणे लगावले.