हृदयद्रावक : बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षाची चिमुकली ठार.
नाशिक वनपरिक्षेत्रातून अत्यंत दुर्दैवी अशी बातमी समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेला धुमडी या गावांमध्ये अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी शहरीकरण होत आहे त्यामुळे जे जनावर आहेत जंगलातील जे प्राणी आहेत त्यांना वास्तव्य करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा जंगलातील प्राणी मानव वस्तीमध्ये शिकारीसाठी येत असतात. प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी राहण्यासाठी वास्तव्य करण्यासाठी जंगलाची निर्मिती झालेली आहे. जंगलामध्ये फक्त प्राणीच नाहीत अखंड जैवविविधता असते जेव्हा जंगलं तोडून त्या ठिकाणी वस्ती निर्माण होते तेव्हा या प्राण्यांनी नेमकं जायचं कुठं हा प्रश्न उपस्थित राहतो.
अशावेळी मग बऱ्याचदा हे प्राणी आपल्याला मानव वस्तीमध्ये शिरताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर गाव खेड्यांमध्ये शिवारात फिरत असताना देखील बऱ्याचदा शेतकऱ्यांना तेथील नागरिकांना हे प्राणी दिसून येतात. त्यामध्ये बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये बिबट्या हा प्राणी दिसतो. हि बातमीदेखील बिबट्या बद्दलची आहे धुमडी गावात सायंकाळच्या सुमारास एका शाळकरी मुलीवरती बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मध्ये हा बिबट्या त्या शाळकरी मुलीला जंगलात घेऊन गेला. सुमारे साडे चार तास वनाधिकारी कर्मचारी यांनी परिसर पिंजून काढला. पण खाली हात ते माघारी आले आणि रात्री अकरा वाजता गावापासून दीड किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या झुडपात बालिकेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.
या घटनेमुळे या गावावरती शोककळा आली आहे तर दुसरीकडे बिबट्याचे वातावरण देखील निर्माण झाल आहे. वन विभागाच्या नाशिक परिक्षेत्र कार्यालयातून ही माहिती प्राप्त झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघ परिवारांच्या घरातील अंगणामध्ये रुची वाघ वय वर्ष 8 हिला बिबट्यानं जोरात आपल्या जबद्यात धरून जंगलात घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळतात वन विभागाला कळविण्यात आलं. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे हे घटना स्थळी पोहोचले त्यांनी आपले पथक देखील त्या ठिकाणी रवाना केलं. अजमेरी मुळेगाव नाशिकचे वन कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त पथकाला घटनास्थळी पाचारण केलं.
हातात बॅटरी घेऊन सर्वत्र बालिकेचा शोध घेतला. मात्र अंधार असल्यामुळे ही बालिका आढळून आली नव्हती. अकरा वाजल्यानंतर गावाच्या अगदी दीड किलोमीटर अंतरावरती झाडाझुडपांमध्ये या बालिकेचा मृतदेह आढळून आला. वन कर्मचारी शव ताब्यात घेऊन पंचनामा केला. तिला शहर रुग्णालयात हलवलं या घटनेने संपूर्ण गावावरती दहशत पसरलीय मुक्त संचार करणारा बिबट्याला बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहेत. बिबट्याच्या प्रवनक्षेत्रात वनखात्याकडून रात्रीच पिंजरे तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती मिळते.