१२वी तील शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबतच केले असे काही.

महाविद्यालय किंवा शाळा कॉलेजेस हे ज्ञानदानाचे ठिकाण आहेत. या ठिकाणाहून ज्ञान संपादन करून या देशाचा सुजाण नागरिक घडत असतो. मात्र अशाच महाविद्यालयांमध्ये अत्यंत दुर्दैवी अशा काही घटना घडतात. अयोध्या या ठिकाणाहून ही बातमी समोर येते आहे त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने आपल्या शिक्षिकेची हत्या केल्याची घटना घडली आहे. बारावीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आपल्या शिक्षिकेची हत्या का केली याचं कारण देखील पुढे आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारावीत शिकणारा तरुणाचे या शिक्षिकेसोबत अफेअर सुरू होता. त्याला हे नातं तोडायचं होतं मात्र शिक्षिका त्याला आणखी अडकवण्याचा प्रयत्न करत होती आणि रोजच्याच या गोष्टीला कंटाळून त्यांन अखेर या शिक्षिकेचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि याच प्रेम संबंधातून या विद्यार्थ्यांन टोकाचे पाऊल उचललं या घटनेचा घटनाक्रम कसा आहे यावरती आपण नजर टाकूयात.
उत्तर प्रदेश मधील आयोध्या शहरात अंगावर शहारे आणणारी ही घटना घडली आहे यामध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षिकेच्या हत्या प्रकरणात या विद्यार्थ्याला ही अटक झाली हा आरोपी आणि मयत शिक्षिका हे दोघंजण रिलेशनशिप मध्ये होते अशी बातमी समोर येते आहे. हे प्रकरण असं होतं इयत्ता बारावीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आली असून फुटेज मध्ये त्याची ओळख पटली आहे. त्याने घातलेल्या टी-शर्टमुळे त्याची ओळख पडली आणि त्याला अटक करण्यास मदत झाली. अशी माहिती अयोध्येचे उपमहा निरीक्षक यांनी दिली आहे.
बारावीचे वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं बारावीच्या वर्षात आपल्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाची बोर्डाची परीक्षा असते मात्र अशाच बारावीच्या वर्गातील शिकणारा हा मुलगा आरोपी झालाय. १२ वी च्या वर्षानंतर आयुष्यातील पुढचे ध्येय ठरत असते, आयुष्याला खरे वळण हे याच वर्षापासून मिळत आहे आणि त्यात याचे शिक्षिकासोबतच लफडे असल्याने त्याला तो दाग्पण लावून घ्यायचा नव्हता, या वयामध्ये अशी काही बदनामी त्याला असहनीय होती आणि त्यामुळेच त्याने असे काही पावूल उचलले आहे असे त्याने सांगितले त्याला अटक देखील करण्यात आली आपला अफेअर उघडे होईल आणि त्यानंतर आपली समाजात बदनामी होईल त्यामुळे या रिलेशनशिप मधून बाहेर पडायचं होत यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र ही शिक्षिका त्याला वारंवार अपमानास्पद वागणूक देत होती धमकावत होती आणि या गोष्टीमुळे त्यांनी या शिक्षिकेचे हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे
या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करतात या प्रकरणात फक्त एवढंच कारण होतं का हे आता पोलिसांच्या तपासी आणखी देखील समोरील येईलच मात्र विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचं प्रेम संबंध असणे आणि त्यातून अशा हत्या होणार हे शैक्षणिक संस्थांना किंवा शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे.