विठुरायाच्या महापुजाला मुख्यमंत्री शिंदेनी सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावली.
बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील जनतेला एक प्रश्न पडला होता. या आषाढी एकादशीला नेमका मुख्यमंत्री कोण असेल ? विठुरायाच्या महापूजेसाठी नेमकी कुणाला मान मिळणार ? या मध्ये दोन नावं सगळ्यांच्या तोंडावर येत होती, एक म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या दोघांमधील विठुरायाच्या महापूजेसाठी नेमकं कोणाचा नंबर लागणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता.
पण मधल्या काही कालावधीमध्ये जे काही राजकारणाला वळण मिळाले, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे राजकारणामध्ये बंडखोरी केली. त्यानंतर एक निकाल समोर आला की, महापूजेसाठी ना ठाकरेंना मान मिळणार, नाही फडणवीस यांना या वर्षीचा विठुरायाच्या महापूजेचा मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पत्नी सोबत विठुरायाची महापूजा केली. त्याचप्रमाणे या वर्षी शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून बीड जिल्ह्यातील गेवराई येथील रुई गाव चे वारकरी मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई यांना वारकरी जोडप्याचा मान मिळाला. या महापूजा मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी हा पाऊस असाच राहू दे व माझ्या बळीराजा सुजलाम-सुफलाम होऊ दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
महापूजा झाल्यानंतर मंदिर समितीच्या कार्यक्रम मध्ये देखील ते सहभागी झाले आणि यावेळी बोलताना म्हणाले की, पंढरपूर शहराचा तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या वर्षीचा विठुरायाच्या महापूजा मान मुख्यमंत्री शिंदे यांना भेटला. मुख्यमंत्री शिंदे त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, व सुनबाई वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश शिंदे या सर्वांसोबत येऊन त्यांनी महापूजेचा मान घेतला. या पूजेच्या वेळी संपूर्ण शिंदे परीवार हजर होते.