सोयगाव तालुक्यात रिपरिप पावसाची सात तास संततधार…..एकाच रात्री तालुक्यात १९९ मी.मी पावसाची नोंद.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगावसह तालुक्यात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाच्या रिपरिप सलग सात तास संततधार झाल्याने सोयगाव तालुक्यात काही ठिकाणी नद्या,नाल्यांना पूर आले होते तर काही भागात पावसाची रिपरिप कमी असल्याने काही भागात नद्या,नाल्यांना पाणी आलेले नसल्याची स्थिती आहे.मात्र या पावसाच्या रिपरिपमुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून या पावसामुळे जमिनीची तहान भागली आहे.झालेल्या पावसामुळे तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षाकडून मिळाली आहे.
सोयगाव तालुक्यात खरिपाच्या ८४ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहे परंतु पावूसच नसल्याने खरीपाची अडचण झाली होती मात्र शनिवारी झालेल्या रिपरिप पावसामुळे सर्वत्र सुखद गारवा झाला असून खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे.सोयगाव तालुक्यात एकाच रात्री चारही महसूल मंडळात १९९ मी.मी पावसाची नोंद करण्यात आली असून सोयगाव मंडळात सर्वाधिक १७ मी.मी पावसाची नोंद झाली आहे.जरंडी-५३,बनोटी-४४ आणि सावळदबारा मंडळात ३१ मी.मी पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसील सूत्रांकडून हाती आली आहे.तालुक्यात सर्वत्र पावसाच जोर कमीच होता परंतु अजिंठ्याच्या डोंगररांगात मोठा पावूस झाल्याने काळदरीच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या अग्नावती नदी दुथडी भरून वाहत होती.मात्र इतरत्र ठिकाणी पूर आला नव्हता फर्दापूर परिसरात पावसाचा जोर कमी होता मात्र वाघुर नदीला पूर आला होता तालुक्यात या दोन्ही ठिकाणी वगळता कोणत्याही ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली नाही.त्यामुळे झालेल्या पावसाच्या संतधार रिपरिपचा पिकांनाच मोठा फायदा झालेला आहे.
—-शनिवारी रात्रीपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप रविवारी उशिरापर्यंत सुरूच असल्याने सोयगाव तालुक्यातील पावसाच्या रिपरिप मुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
—–सोयगाव मंडळात ७१ मी.मी पावसाची नोंद—-
सोयगाव मंडळात शनिवारी रात्री झालेल्या पावसाच्या रिपरिपची सात तासात ७१ मी.मी नोंद झाली आहे.मात्र हा पावूस नुकसानकारक नसल्याचे सांगण्यात येत आहे.
—–फर्दापूरला वाघुर नदीला पूर मात्र पावसाची नोंद कमी—-
सावळदबारा मंडळातील फर्दापूर परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या ३५ मिनिटाच्या पावसाने दाणादाण उडवून दिली होती मात्र पर्जन्यमापन परिसरात कमी पावूस झाल्याने फर्दापूर परिसरात झालेल्या दमदार पावसाची नोंद पर्जन्यमापन केंद्रात झालेली नाही.त्यामुळे अतिवृष्टीच्या निकषातून शनिवारी फर्दापूर परिसर वगळले आहे.
—–हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा—
हवामान अंदाज:-प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार औरंगाबाद जिल्ह्यात दि.११,१२ व १३ जुलै २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी.
चौकट-शेतकऱ्यांना सल्ला…..
शेतकरी बांधवांनी शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
पाऊस चालू असताना जनावरांना चरावयास सोडू नये.तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.
विनाकारण बाहेर जाणे टाळावे.
मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पूरजन्य स्थिती निर्माण होऊ शकते यामुळे ओढा, नदी नाले यांपासून सुरक्षित राहावे. असा सल्ला वर्तविण्यात आलेला आहे.