पावसाळ्यात बहरतेय अजिंठा लेणीचे सौंदय….पर्यटकांच्या संख्येत वाढ

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी

अजिंठा डोंगर रांगेत वसलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या नैसर्गिक सौंदयात पावसळ्यात भर पडत आहेत अजिंठा लेणीचे हेच नैसर्गिक सौंदय आणि कोसळणारा धबधबा देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करतांना दिसत आहे.काही दिवसांपासून लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात अजिंठा लेणी बंद करण्यात आली होती.तर अनेक दीवस बंद- चालू करण्यात येत होती त्यामुळे येथील पर्यटकांनावर अवलंबून असेलेले छोटे -मोठे व्यावसायिक यांना आर्थिक परिस्थितीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. मात्र आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने अजिंठा लेणी सुरळीत सुरू झाली आहे. महिनाभर पावसाच्या प्रतिक्षेनंतर गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने अजिंठा लेणीच्या परिसरात हिरवा शालू पांघरला गेलाय.

तर लेणीतील धबधबा देखील सुरू झालं आहे.यामुळे सौंदयात भर पडली असून लेणीवर भेटीसाठी येणाऱ्या पर्यटक संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवार व रविवार या दिवशी सर्वात जास्त पर्यटक लेणी पाहण्यासाठी येत आहेत. काल पासून सुरू झालेल्या धबधब्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करताना दिसत असून अनेकजण हे विहंगम दृश्य आपल्या कॅमेरात कैद करताना दिसत आहे.