तिकडे सासूचा मृत्यू झाला, इकडे सुनेकडून नको ते घडले.

राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात एक शेजूळ कुटूंब रहावयास आहे.
त्या कुटुंबातील सासू- मालनबाई पांडुरंग शेजूळ यांना दिनांक ७ जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान अचानक त्रास होऊ लागला. घरातील नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र पहाटे एक वाजे दरम्यान -हदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्या मयत झाल्या. काही वेळातच सुन- मिराबाई भाऊसाहेब शेजूळ, वय ५५ वर्षे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील त्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले. सासू मयत झाल्याचे समजताच त्यांना -हदय विकाराचा तिव्र झटका आला. आणि पहाटे दिड वाजे दरम्यान म्हणजे सासू मयत झाल्या सासूच्या निधनाची वार्ता कानावर येतात सासूचा विरह सहन न झाल्याने अवघ्या अर्ध्या तासाने सुनाने अखेरचा श्वास घेतला. सुनाने अखेरच्या श्वासापर्यंत सासूची साथ सोडली नाही. मृत्यूनंतरच्या प्रवासाला देखील दोघी बरोबरच राहिल्या. त्यांच्या या सासु सुनेचा अनोखा प्रेमाने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे अशी चर्चा नागरिकात होत आहे.
सध्या समाजामध्ये सासू सुनेचे वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. मात्र सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेने देखील अखेरचा श्वास घेतला. आणि सासू व सून दोघी मिळून मृत्यू नंतरच्या प्रवासाला लागल्या. सासू सुनेचे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त करत अश्रू अनावर झाले.
मृत्यू नंतर सासू मालनबाई व सून मिराबाई या दोघींची अंत्ययात्रा एका मागे एक त्यांच्या घरापासून ते गणपती घाट पर्यत नेण्यात आली. अंत्यविधीसाठी सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मात्र आजच्या काळात सासू व सुनेचे असे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली. तसेच शेजूळ कुटूंबावर कोसळलेल्या या दुखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो. अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.