ज्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले, ते २६ वर्षाने पुन्हा घरी आले. पहा सविस्तर बातमी
आयुष्यामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही. आपण मात्र आयुष्य जगत राहायचं असतं. कधी आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडतील कधी आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतील. कधीकधी आयुष्यामध्ये वाईट गोष्टींमधून चांगल्या गोष्टी घडत असतात. आयुष्य जगत असताना अचानक काय होईल किंवा अचानक चांगली गोष्ट कानावर पडेल की वाईट गोष्ट कानावर पडेल याच देखील सांगता येत नाही. कारण देवाचा खेळ कुणाला कळला नाही.
अशीच एक घटना या बातमीमध्ये घडली आहे स्वप्नेश्वर दास व त्याची पत्नी हे दोन मुलांसह ओडिशाचा कटक मध्ये राहायचे व ते शेती करून उदरनिर्वाह करायचे 26 वर्षांपूर्वी दास यांची मानसिक स्थिती ढासळली आणि अचानकपणे ते बेपत्ता झाले. एखाद्याचं नशीब कधी आणि कसा बदलेल सांगता येत नाही आपण नशीब बदलण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतो पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असतं. दैवाचा खेळ हा निराळा असतो. ओडीसा च्या कटर जिल्ह्यातील सेंधा बिली गावातील दास यांच्यासोबत असाच प्रकार घडला एकाएकी बेपत्ता झाले अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी बरीच वर्षे त्यांची वाट पाहिली मात्र दास यांचा थांगपत्ता लागला नाही आणि अखेर वाट पाहणं सोडून देऊन ते आता आपल्यात नसतील असं समजून त्याच्या कुटुंबियांनी दास यांच्यावर अंत्यसंस्कार केले
अचानकपणे तब्बल 26 वर्षाने दास यांचा ठावठिकाणा त्यांच्या कुटुंबांना समजला. त्यांच्या कुटुंबासोबत गाठ भेट झाली. दास त्याच्या पत्नीसोबत ओडिशाच्या कटकमध्ये राहायचे आपल्या कुटुंबासाठी शेती करून ते उदरनिर्वाह करायचे पंचवीस वर्षांपूर्वी त्यांची मानसिक स्थिती ढासळली आणि ते अचानकपणे बेपत्ता झाले. कुटुंबाने भरपूर शोध घेऊन देखील त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. स्थानिक परंपरेनुसार कुटुंबाने त्यांच्या नावाने अंत्यविधी केला व दास यांची पत्नी एक विधवा प्रमाणे आयुष्य जगू लागली.
आणि दुसऱ्या बाजूला यांची मानसिक स्थितीवर परिणाम झालेले दास ओडीसा मधून तामिळनाडूमध्ये गेले. विल्लुपुरम येथील अनुभव ज्योती आश्रमातील काहींना ते रस्त्याने फिरताना दिसले. त्यानंतर आश्रमातल्या स्वयंसेवकांनी त्यांना आश्रमामध्ये दाखल केले. 2021 मध्ये दास यांना तामिळनाडूतून राजस्थानच्या भरतपूर मधील आपणा घर येथे आणण्यात आले. आणि त्या ठिकाणी त्यांना चांगला उपचार मिळाल्याने यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकांना त्यांच्या घराचा पत्ता सांगितला. आणि त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली वडील जिवंत असल्याची माहिती मिळताच त्यांचे पुत्र संजय हे तातडीने भरतपूरला पोहोचले.
एका पुत्राची आपल्या वडिलांसोबत 26 वर्षांनी भेट झाली होती, वडील दास हे जेव्हा बेपत्ता झाले होते तेव्हा त्यांच्या मुलाचे म्हणजेच संजयचे वय १३ तेरा होते आणि आज यांचा मुलगा हा विवाहित आहे. दासची मानसिक स्थिती बिघडली त्यावेळेस त्यांचा मुलगा नववी मध्ये शिकत होता. त्यांचा मुलगा सांगतो की आम्ही वडिलांना खूप शोधलं, त्यांची वाट पण पाहिली, पण अखेर काळजावर दगड ठेवून आम्ही त्यांचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा अचानकपणे ती जिवंत असल्याचा आम्हाला कळलं त्या क्षणी मी त्यांना घेण्यासाठी घरून निघालो अशी भावना त्यांच्या मुलाने व्यक्त केली.