‘ तुझ्या फोनमध्ये नागडे फोटो, व्हिडिओ आहेत….’ अशी धमकी देणाऱ्याची पहा काय अवस्था केली.

मित्रांच्या मैत्रीबद्दल काय सांगायचं ? इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे की, मित्र म्हणजे ” ब्रदर फ्रों अनदर मदर ” म्हणजेच मित्र म्हणजे हा भाऊच आहे फक्त त्याने दुसऱ्या आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आपण पाहतो की मैत्रीमध्ये एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी जीव देखील देण्यासाठी तयार होतो, आपले गुपित बऱ्यापैकी हे आपल्या मित्रांना माहित असतात, आपल्या चुकी मध्ये किंवा आपल्या चांगल्या गोष्टींमध्ये मित्र कायम सोबत असतो, बऱ्याच वेळेस आपण जर चुकीच्या रस्त्याने चाललो तर तो रस्ता चुकीचा की बरोबर हे सांगण्याचे काम देखील मित्र करत असतो, मित्राची एक व्याख्या नाही आणि मित्राची मैत्री समजने हे देखील एवढे सोपे नाही. पण कधी कधी या मैत्रीला ही नजर लागते आणि एका सख्ख्या भावासारखे राहणारे दोन मित्र एकमेकांचे जानी दुश्मन होतात. हे इथपर्यंत जानी दुश्मन होतात की एकमेकांना कसे संपवायचे याचे नियोजन करायला लागतात.
अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील झाशीच्या परिसरामध्ये घडले आहे. ६ जुलै रोजी ११ वर्षे मुलगा बेपत्ता होतो. त्याचा खूप शोधाशोध करूनही सुगावा लागत नाही, त्यानंतर त्या मुलाचे वडील पोलिसांकडे तक्रार करतात. तेव्हा पोलीस शोध घेत असताना गावात एका ठिकाणी मुलाचा मृतदेह पडलेला आढळून आला. श्वानपथक पथकासह पोलिस तातडीने दाखल झाले पोलिसांनी तो मृतदेह ताब्यामध्ये घेऊन घटनास्थळाची पाहणी केली असता, त्या ठिकाणी एकच गर्दी जमली. आणि त्या गर्दी मध्ये आरोपी होते यामध्ये पोलिसांनी तपास करत असताना राणी या स्निफर डॉग ने गर्दी मध्ये उपस्थित असलेल्या राघवेंद्र राजपूत व बाल शोषण करणाऱ्याला ओळखल आणि तेव्हा तेथील ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले.
त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, गावातील अरविंद, श्रीनिवास, जितेंद्र दुबे, राघवेंद्र राजपूत आणि बाल अत्याचार करणारे हे मृत मुलाचे जवळचे मित्र असल्याचे उघड झाले. ज्याने बालअत्याचार केले त्याला वगळता इतरांची वय सुमारे २३ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये पोलिसांनी हत्येतील आरोपी आहे त्यांना अटक करून त्यांच्याकडील दंडुका, रक्ताने माखलेली खाट, मोबाईल फोन जप्त केला आहे. चौकशीमध्ये मुलाची हत्या का केली असे विचारल्यानंतर मित्रांनी सांगितले की, हा मुलगा त्याच्या मित्राच्या मोबाईल मध्ये पब्जी गेम खेळत होता. त्या दरम्यान गेम खेळत असताना त्या मोबाईल मधील गॅलरीत अश्लील व्हिडिओ व फोटो त्याने पाहिले होते. आणि हे पाहिल्यानंतर त्या मुलाने सांगितले की, या अश्लील व्हिडिओ व फोटो बाबत मी सर्वांना सांगेल असं म्हटल्यानंतर आपले रहस्य उघड होईल की काय या भीतीने धमकी देणाऱ्या मुलाची हत्या केली गेली.
यामध्ये आणखी सविस्तर मिळालेली माहिती अशी की, मृताचे मित्र पब्जी गेम खेळायचे मृत व बाल अत्याचार करणाऱ्या कडे मोबाईल फोन नव्हता हे दोघेही राघवेंद्र राजपूत च्या मोबाईल मध्ये गेम पाहायचे आणि खेळायचे यामधील एक रवी याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते व त्या रवीने मोबाईल मध्ये काही आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ सेव करून ठेवले होते. आणि मृत मुलाने पब्जी गेम खेळण्याच्या बहाण्याने ते सगळं पाहिलं होतं. आणि हा प्रकार रवीला कळताच त्याने अपशब्दांचा भीतीने शिवीगाळ केली. यावर तो मृतक बालक म्हणला की मी तुझ्या मोबाईलमध्ये असलेलं सर्व काही सर्वांना सांगेल. आणि यानंतर रवी, जितेंद्र आणि बालगुन्हेगार या सर्वांनी मिळून मुलाच्या हत्येचा कट रचला. मृत मुलाला पब्जी खेळ खेळण्याच्या बहाण्याने मंदिराजवळ बोलवलं मृत बालक व अत्याचार करणाऱ्यांनी योजनेनुसार पब्जी गेम दाखवून शेजारी बसवले रवी, जितेंद्र लपून बसलेली होती. गेम खेळून झाल्यानंतर त्याला बाजूला बोलावून घेतले व त्या ठिकाणी मृत सुमितला या सगळ्यांनी मिळून दांडक्याने, लोखंडी रॉडने, तसेच मान दाबून त्याचा खून केला. या सुमितची हत्या करून झाल्यानंतर या सगळ्यांनी मिळून तो मृतदेह लाकूड व धान्याच्या गोण्याखाली पुरवून ठेवला. खाली पुरवून ठेवला इतर चौकशी पोलीस अधिकारी करत आहे.