NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष आ. खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची सद्यपरिस्थिती काय आहे याचा आढावा मांडला.

ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील काळात पाच वर्षे विरोधात काढली. त्यानंतर झालेल्या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ५४ आमदार निवडून आणले. आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवे सरकार स्थापन झाले. भाजप पक्षाला पवार साहेबांनी पुन्हा आव्हान दिले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना रूचले नाही व पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी झाला. देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कोणी थांबवत नव्हते. मात्र महाराष्ट्रात पवार साहेबांनी हा अश्वमेध रोखला. पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करुन दाखवत राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन केले. या कृतीतून महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, हा विश्वास त्यांनी निर्माण केला.”

राज्यातील सर्व यंत्रणा विरोधकांना झुकविण्यासाठी वापरात आणली जात आहे. त्यामुळे आता केवळ न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास राहिला आहे. पुढील काळात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे यावा यासाठी लोकांच्या मनाला गवसणी घालायला हवी. विरोधात राहूनही सत्ताधारी जे करू शकत नाहीत ते राष्ट्रवादी करून दाखवत आहे, असं सामान्य गोरगरीब माणसाला वाटलं पाहिजे. यासाठी रस्त्यावर येऊन लोकांचे प्रश्न मांडण्याची तयारी आपण ठेवायला हवी. आपण प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करायला हवे. प्रत्येक समाजाला सोबत घेऊन पुढे जायला हवे. हे सगळं केलं तर २०२४ हे वर्ष आपलंच असेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा. अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते मा. छगन भुजबळ, मा. हसन मुश्रीफ, खासदार सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्माबाबा आत्राम, प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, विद्यार्थी सेल प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष अॅड. जयदेव गायकवाड, डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, आदिवासी सेल प्रदेशाध्यक्ष राजू तोडसाम, उद्योग व कामगार सेल प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, वक्ता सेल प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके, सेवा दल प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील तसेच विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, सर्व फ्रंटल व सेलचे पदाधिकारी, जिल्हा निरीक्षक, जिल्हाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.