नगर ब्रेकिंग : मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे ते हटवण्याचे काम महानगरपालिका करत आहे. आणि हे अतिक्रमण काढत असताना विरोध होणे काही नवीन नाही. आणि अशीच एक घटना अहमदनगर मधील जुने जिल्हाधिकारी ऑफिस जवळ घडली आहे.
नेहमीप्रमाणे महानगरपालिका अतिक्रमण काढत होते त्यावेळेस हे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे, यामध्ये कर्मचारी जखमी झाला असून त्यावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे या दगडफेकीत मध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव दत्तात्रय केशन जाधव असे आहे. या दगडफेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महानगर पालिकेच्या पथकावर दगडफेक केली आहे अशी माहिती महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली आहे. यामध्ये युनियनचे अध्यक्ष बोलताना म्हणतात की, महानगरपालिका पथकावर हल्ला झाला आहे.
आणि त्यामुळे सर्व आरोपींना पकडले शिवाय नगर शहरातील चारही विभागाचे काम सुरू होणार नाही तसेच जर भविष्यामध्ये आरोपी पकडले गेले नाही तर संपूर्ण महानगरपालिका बंद ठेवण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला आहे. या प्रकरणातील अधिक तपास कोतवाली पोलिस स्टेशन हे करत असून महानगरपालिकेचे दत्तात्रय जाधव यांच्या फिर्यादीवरून या जमा विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे गुन्हा नोंदवला गेला आहे.