आपल्या बायकोच्या रोजच्या आर्थिक वादाला वैतागून अक्षरशा नवऱ्याने उचलले हे पाऊल.

आपल्या महाराष्ट्र मध्ये राज्यामध्ये बिहार प्रमाणे गुन्हेगार व गुन्ह्यांची संख्या वाढताना आपण पाहत आहोत. आपल्या राज्याच्या अनेक भागांमध्ये मारामाऱ्या, हत्या, चोरी, अत्याचार अशा बातम्या येतच असतात. घर म्हणाले कि वाद होतातच आणि नवरा बायकोचे वाद तर कायमच होत असतात. पण वाद कितीही झाले तरी नवरा बायकोचे संबंध कधी संपत नाही. किंवा ते झालेले वाद जास्त वेळ टिकत नाहीत. त्या भांडणाला एक मर्यादा असतात. कितीही राग आला तरी जास्त टोकाचे पाऊल नवरा सहसा घेत नाही.पण वेळ काळ कधी काय घडवून आणील सांगता येत नाही.
अशीच एक बातमी मुंबईच्या धारावी भागातून येत आहे. अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बरेच दिवसापासून चाललेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा गुन्हा घडल्याचे सांगण्यात आला आहे. बऱ्याच दिवसापासून आर्थिक व्यवहाराचा वाद होत होता आणि काही केल्या हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नव्हती. म्हणून संतापाच्या भरात एका पतीने आपल्या पत्नीवर व काही नातेवाईकांवर गोळीबार केल्याची घटना मुंबईच्या धारावी भागात घडली आहे.
बरेच दिवस होऊन देखील त्यांच्यातील आर्थिक वाद मिटत नव्हते कित्येक वेळा बऱ्याच जणांनी मध्यस्थी करून देखील यामध्ये काही तोडगा निघत नव्हता. आणि कायमच्या होणाऱ्या किचकिचला वैतागून हा व्यक्ती चुकीचे पाऊल उचलतो. आणि आपल्या पत्नीला गोळ्या मारून ठार करतो. आणि तो यावरच न थांबता तो पत्नीसोबत इतर नातेवाईकांवर देखील गोळीबार करतो. सदरील घटना घडताच त्या ठिकाणी पोलीस घेऊन या आरोपी पतीला अटक करतात.
या बाबतची सखोल चौकशी सध्या मुंबई पोलीस यांच्याकडून केली जात आहे. या चौकशीमध्ये तपास केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.