नगर ब्रेकिंग : ” माझ्या बायकोबद्दल तू अस कसकाय बोलतो ? तुला दाखवतोच…” पाहा सविस्तर बातमी.

मित्रांच्या मैत्रीबद्दल काय सांगायचं ? इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे की, मित्र म्हणजे ” ब्रदर फ्रों अनदर मदर ” म्हणजेच मित्र म्हणजे हा भाऊच आहे फक्त त्याने दुसऱ्या आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आपण पाहतो की मैत्रीमध्ये एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी जीव देखील देण्यासाठी तयार होतो, आपले गुपित बऱ्यापैकी हे आपल्या मित्रांना माहित असतात, आपल्या चुकी मध्ये किंवा आपल्या चांगल्या गोष्टींमध्ये मित्र कायम सोबत असतो, बऱ्याच वेळेस आपण जर चुकीच्या रस्त्याने चाललो तर तो रस्ता चुकीचा की बरोबर हे सांगण्याचे काम देखील मित्र करत असतो, मित्राची एक व्याख्या नाही आणि मित्राची मैत्री समजने हे देखील एवढे सोपे नाही. पण कधी कधी या मैत्रीला ही नजर लागते आणि एका सख्ख्या भावासारखे राहणारे दोन मित्र एकमेकांचे जानी दुश्मन होतात. हे इथपर्यंत जानी दुश्मन होतात की एकमेकांना कसे संपवायचे याचे नियोजन करायला लागतात.
पण ही बातमी जरा वेगळी आहे. मंगळवार दिनांक 12 रोजी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान दोन मित्रांमध्ये वाद होतात. त्यातील एक मित्र दुसऱ्या मित्राच्या बायको बद्दल अपशब्द वापरतो. अशा वेळेस आपला मित्र आपल्या बायकोबद्दल अपशब्द वापरतो याचा राग मनात धरून हा मित्र त्याचा दुसरा मित्राचा गळा आवळून हत्या करतो.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, आपल्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचा रागातून दोघांनी एकाचा खून केलेली घटना घडली आहे. नगर तालुक्यातील चास येथील फलके फार्म हाउस च्या पाठीमागे ही घटना घडली. नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. यामध्ये हत्या करणार्यांचे नाव हनुमंत गायकवाड वय 24, सुरज मोरे वय २२ ( राहणार बाबुर्डी घुमट तालुका जिल्हा अहमदनगर ) हे आरोपी असून. राहुल मोरे वय 19 ( राहणार बाबुर्डी घुमट तालुका जिल्हा अहमदनगर ) असे त्याचे नाव आहे.
दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान आरोपी व मयत यांच्यामध्ये वाद होतात. यावेळी मयत राहुल मोरे यांनी आरोपी सुरज मोरे यांच्या पत्नी बद्दल अपशब्द वापरले. आणि आरोपी हनुमंत व सुरज या दोघांनी मिळून राहुल मोरे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह आहे त्याच ठिकाणी ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी आरोपी हनुमंत गायकवाड याने अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपण खून केला आहे अशी माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी आरोपीकडे याबाबत अधिक चौकशी केली असता, त्यात शिवारातील फलके फार्म च्या मागे ही घटना घडली आहे असे आरोपी गायकवाड याने पोलिसांना सांगितले. यानंतर कोतवाली पोलिसांनी नगर तालुका पोलिसांना याबाबतची माहिती देत आरोपी सह घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळेस पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी सुरज मोरे याला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी राहुल मोरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी दुपारी उशिरापर्यंत चालू होती.