नगर वार्ता : बापच त्याच्या अल्पवयीन मुलीसोबत करतो असं काही.
अहमदनगर जिल्ह्यातून राहुरी तालुक्यातील ही घटना आहे बाप आणि मुलीचे नाते हे किती प्रेमळ आणि महत्वाचे असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. बापाने बोलून नाही दाखवले तरी, जेव्हा तो आपल्या मुलीला विदा करतो त्यावेळेस सगळ्यात जास्त मनातल्या मनात बापच रडतो. मुलगी धनाची पेटी मानली जाते आणि ती कमी दिवसासाठी आपल्या घराची पाहुणे असते म्हणून तिच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तिचा बाप करत असतो. आपल्या मुलीसाठी सगळ्यात जास्त हळवा हा फक्त बापच होत असतो.
पण एका बापाने चक्क आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिले. ही घटना राहुरी तालुक्यातील असून हा बाप आपल्या बायको व मुलांना सोडून दुसऱ्या महिलासोबत सध्या संसार करत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, या बापाला पहिली एक बायको व चार मुली, एक मुलगा आहे. गेल्या तीन वर्षापासून तो बायको आणि मुलांना सोडून शहरातील मुलं माथा परिसरात एका महिलेसोबत राहत आहे दोन महिन्यापूर्वी त्याने पहिल्या बायकोकडून 3 नंबरच्या मुलीला घेऊन गेला आणि त्या मुलीच्या आईला काहीच न सांगता परस्पर त्या अल्पवयीन मुलीचे लग्न जमवतो. 12 जुलै रोजी त्या अल्पवयीन 14 वर्ष मुलीचा विवाह टाकळीमिया येथील रहिवासी असणाऱ्या 25 वर्षीय मुलाबरोबर राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात एका चर्चमध्ये लावून देतो.
याबाबतची माहिती मुलीच्या आईला कळतात मुलीची आई राहुरी येथील वकील खान व सामाजिक कार्यकर्ते इमरान यांच्याकडे धाव घेते. आणि हे सर्वजण राहुरी पोलीस ठाण्यामध्ये जातात. मला व माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या अशी मागणी त्या पीडित मुलीच्या आईने पोलीस अधिकार्यांकडे केली. या बापावर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलीची आई पोलीस स्टेशन मध्ये ठाण मांडून बसली होती. दुपार होऊन देखील त्या बापावर गुन्हा दाखल केला गेला नव्हता. बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणारा तो फादर कोण ? त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
पीडित मुलीच्या आईवडिलांनी सुमारे एक ते दोन वर्षांपूर्वी एक लग्न लावून दिले होते त्यानंतर पहिल्या पतीपासून सोडचिठ्ठी घेतली त्यानंतर काल त्याच अल्पवयीन मुलीचा दुसरा विवाह लावून दिला. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल का ? त्या पीडित मुलीला न्याय मिळणार का ? असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे.